नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात भीषण अपघात..
ट्रक मध्ये ३५ रेडकु होते यात २६ जागीच ठार झाल्याची माहिती
नवापूर तालुक्यातील चरणमाळ घाटात भीषण अपघात झाला असून अपघातात म्हशीचे पिल्लू वासरू ठार झाले आहे. तर काही योग्य जखमी झाल्या आहे.
सकाळी म्हशी व वासरु घेऊन ट्रक पिंपळनेर कडून गुजरात कडे जात असल्याचे समजते. पिंपळनेर कडून सकाळी सात वाजता गुजरात कडे जात असताना ट्रक चरणमाळ घाटात च्या वळणावर आल्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे ट्रँक घाटात पलटी झाला आहे. अपघात होताच घाट परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. ट्रक मध्ये ३५ रेडकू होते यात २६ जागीच ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे.त्याला नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
स्थानिक नागरिकांनी जीवनधारा अम्बुलनला संपर्क साधून जखमींना तातडीने उपचारासाठी लाजरस गावीत यानी उपजिल्हा रुग्णालय नवापूर येथे दाखल केले. चरणमाळ घाटात अपघाताची मालीका ही सुरु असते या घाटात जास्त प्रमाणात उतार असल्यामुळे येथे नेहमी अपघात होत असतात. चरणमाळ घाटात यापूर्वी अनेक अपघात होऊन अनेकांचे प्राण जाऊन काहींना अपंगत्वही आले आहे. चरणमाळ घाट दुरुस्तीच्या प्रश्न वारंवार येत असतो. मात्र काही काळानंतर हा प्रश्न विसरला जातो. चरणमाळ घाट केव्हा दुरुस्त होणार आहे असा या निमित्ताने पुन्हा सवाल केला जात आहे.