नंदुरबार बाजार समितीतील वादामुळे शेतीमाल खरेदी थांबली-शेतकरी संतप्त
पूर्वसूचना न मिळाल्याने आपला माल घेऊन आलेल्या शेतकरी बांधवांना मोठा धक्का हमाल, मापाडी आणि व्यापारी यांच्यातील वादामुळे नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल, १९ मे रोजी शेतीमालाची खरेदी अचानक बंद पडली. कोणतीही पूर्वसूचना न मिळाल्याने आपला माल घेऊन आलेल्या शेतकरी बांधवांना मोठा धक्का बसला. केवळ एका फलकावर खरेदी बंद असल्याची सूचना होती.शेतकऱ्यांचा रोष, आंदोलनाचा इशारा देण्यात आला या प्रकारामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी भारतीय स्वाभिमानी संघाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी बाजार समिती सचिवांची भेट घेतली असता, वादातून खरेदी बंद असल्याचे सांगण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी लिलाव सुरू करण्याचे आश्वासन दिले, तरी काल दुपारपर्यंत ते सुरू झाले नाहीत.या बंदमुळे शेतकऱ्यांचे वाहतूक खर्च आणि शेतीमाल साठवण्याचे मोठे नुकसान झाले आहे. बाजार समितीकडून होणाऱ्या या पिळवणुकीमुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. जर आजपासून (२० मे) खरेदी-विक्री पूर्ववत सुरू झाली नाही, तर बाजार समितीला कुलूप लावण्याचे आंदोलन करण्याचा इशारा भारतीय स्वाभिमानी संघाने दिला आहे.