नवापूर तालुक्याचे आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम पुर्व आढावा सभेचे आयोजन..
खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न करावे-आमदार शिरिष कुमार नाईक
सन 2025-26 या आर्थिक वर्षात कृषि विभागामार्फत तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्याचे नियोजन तालुका कृषि अधिकारी यांचेकडून करण्यात येत आहे. या नियोजनाची माहिती लोक प्रतिनिधी यांना करुन देण्यासाठी नवापूर तालुक्याचे आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या अध्यक्षतेखाली खरीप हंगाम पुर्व आढावा सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेस आमदार शिरीषकुमार नाईक, तहसीलदार दत्तात्रय जाधव, गट विकास अधिकारी देविदास देवरे, पंचायत समिती कृषि अधिकारी मिस्तरी, विस्तार अधिकारी कुणाल गाडे, कृषि अधिकारी रविकांत पवार, मंडळ कृषि अधिकारी नितिन गांगुर्डे, दिनकर तावडे, राहुल शिरसाठ, प्रशांत पाटील, विद्युत वितरण कंपनीचे अभियंता शेख, कृषि सेवा केंद्र प्रतिनिधी तसेच कृषि विभागाचे क्षेत्रीय कर्मचारी उपस्थित होते.
तालुका कृषि अधिकारी रविशंकर पाडवी यांनी कृषि विभागामार्फत खरीप हंगामात राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. बिजप्रक्रिया मोहिम, घरगुती बियाणे ऊगवण क्षमता चाचणी, माती नमुना घेणे, ऊस पिकातील पाचट व्यवस्थापन, हुमणी व्यवस्थापन, शेतीशाळा, पिक प्रात्यक्षिके, जमिन आरोग्य पत्रिका, फळबाग लागवड, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान, खते बियाणे यांचे व्यवस्थापन, पीक स्पर्धा, कृषि पुरस्कार आदी विषयांवर सविस्तर माहिती देऊन आमदार शिरीषकुमार नाईक यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत तहसीलदार व गट विकास अधिकारी यांनीही सक्रिय सहभाग घेतला.आमदार शिरीषकुमार नाईक यांनी खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्व क्षेत्रीय अधिकारी / कर्मचारी यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तसेच बोगस रासायनिक खते व बियाणे यांचा भरारी पथकामार्फत शोध घेऊन कडक कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.
ही सभा यशस्वी करण्यासाठी साहेबराव देसाई, ज्योती भामरे, नितेशा गावित यांनी परीश्रम घेतले. सभेचे सुत्र संचलन प्रशांत पाटील यांनी केले.