Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

गहाळ झालेले 107 मोबाईल हस्तगत करण्यात नंदुरबार जिल्हा पोलीस दलास यश..!


गहाळ झालेले 107 मोबाईल हस्तगत करण्यात नंदुरबार 
जिल्हा पोलीस दलास यश..!
@पोलीस अधीक्षकांचे हस्ते मुळ मालकांना मोबाईल परत...!!

नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हयातील मागील काही महिन्यांमध्ये गहाळ झालेले नागरिकांचे विविध कंपन्यांचे मोबाईल फोन शोधण्यात नंदुरबार पोलीसांना मोठे यश मिळाले असुन एकुण 107 मोबाईल फोन हे मुळ मालकांच्या ताब्यात परत देण्यात आले आहेत.पोलीसांनी सी.ई.आय.आर.पोर्टलचे मदतीने मोबाईल ट्रॅकिंगसाठी IMEI क्रमांकाचा वापर करुन विविध
ठिकाणी शोधमोहीम राबवली. यात गहाळ झालेले मोबाईल जिल्हयातुन तसेच जिल्हया बाहेरुन देखील हस्तगत करण्यात आले. यामध्ये सायबर सेल, स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस ठाणे यांनी संयुक्तरित्या कामगिरी केली आहे.
आज रोजी संवाद हॉल, पोलीस अधीक्षक कार्यालय येथे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांचे हस्ते गहाळ झालेल्या मोबाईलचे मुळ मालक यांना मोबाईल परत करण्यात आले असुन यावेळी नागरिकांनी पोलीसांचे कामगिरीबद्दल समाधान व्यक्त करुन आभार मानले आहे. "यावेळी पोलीस अधीक्षक यांनी नागरिकांना आवाहन केले की, मोबाईल हरवल्यास तात्काळ सी.ई.आय. आर. पोर्टलवर ऑनलाईन तक्रार दाखल करावी व आपले मोबाईलचा IMEI क्रमांक जपून ठेवणे गरजेचे आहे. जेणेकरुन मोबाईलचा शोध होण्यास मदत होईल.सदर कार्यक्रमावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक  आशित कांबळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील तसेच इतर अधिकारी व अंमलदार असे उपस्थित
होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.