📚 शाळा प्रवेशोत्सव 2025 – जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची जि.प. प्राथमिक शाळा, सुंदरदे येथे आपुलकीने भेट
दिनांक १६ जून २०२५ रोजी नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी (IAS) यांनी शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सुंदरदे, ता. नंदुरबार येथे भेट देऊन नवागत विद्यार्थ्यांचे भरभरून स्वागत केले.
🧒👧 विद्यार्थ्यांशी संवाद व सहभाग:
मा. जिल्हाधिकारी मॅडम यांनी फॉर्मलतेशिवाय थेट विद्यार्थ्यांमध्ये मिसळून त्यांच्यासोबत चटईवर बसून संवाद साधला, शिक्षणाशी संबंधित प्रश्न विचारले, शैक्षणिक खेळ खेळले आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवला. त्यांच्या बालसुलभ भावनेला साद दिली.
शाळा प्रवेशाचा सन्मान:
मा. मॅडम यांनी स्वतः नवागत विद्यार्थ्यांचे पूजन करून त्यांना गुलाब पुष्प, दप्तर, गणवेश आणि पुस्तके देऊन शाळेच्या नव्या पर्वाची सुरुवात अत्यंत स्नेहपूर्वक केली.
शाळेच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे निर्देश:
⦁ इ.५ वी सुरू करण्यासंबंधी अडचणी जाणून घेतल्या
⦁ PAT चाचणी नोंदी तपासून शिक्षकांना मार्गदर्शन
⦁ नवोदय प्रवेशासाठी प्रयत्न वाढवण्याचे निर्देश
‘एक अधिकारी – एक शाळा दत्तक’ या उपक्रमात मॅडम यांनी स्वतः जि.प. उच्च प्राथमिक शाळा, टोकर तलाव दत्तक घेतल्याचे जाहीर केले.
पालक व ग्रामस्थांशी संवाद:
मॅडम यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पालकांशी संवाद साधत, पाल्यांना शाळेत नियमित पाठवण्याचे तसेच शाळेच्या शैक्षणिक व भौतिक उन्नतीसाठी सहभागाचे आवाहन केले.
स्मरणीय क्षण:
विद्यार्थ्यांसोबत शाळेच्या पायरीवर बसून घेतलेला ग्रुप फोटो, त्यांच्या चेहऱ्यावरील हसू आणि उत्साह, ही शाळा भेट कायमच्या आठवणी ठरल्या.
🙏 डॉ. राजेंद्र महाजन (प्राचार्य, डायट, नंदुरबार) यांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की – “मा. जिल्हाधिकारी मॅडम यांचा साधेपणा, शालीनता, शिक्षणात रस आणि प्रशासनातील मानवी मूल्ये यांचा संगम अनुभवता आला.”
🎉 #शाळा_प्रवेशोत्सव2025 |