@ विद्यार्थ्यांनी उत्साहाने योगासनांचे विविध प्रकार शिकून घेतले आणि त्यांचे फायदे अनुभवले..!!
नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालया मध्ये जागतिक योग दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या भव्य मैदानावर झालेल्या या कार्यक्रमात, विद्यार्थ्यांनी विविध योगासने आणि प्राणायामाचे धडे गिरवले. दरवर्षी २१ जून रोजी, योगाच्या अनेक फायद्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. हा दिवस कल्याण आणि चांगल्या आरोग्याला प्रोत्साहन देणारे व्यासपीठ म्हणून काम करतो. या अनुषंगाने जागतिक योग दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे मुख्याध्यापक कमल कोकणी मॅडम व उपमुख्याध्यापक ए एन सोनवणे सर, पर्यवेक्षक जी.डी सूर्यवंशी सर यांच्या हस्ते झाली. त्यांनी योगाचे महत्त्व आणि दैनंदिन जीवनातील फायदे विशद केले. कार्यक्रमात, योग प्रशिक्षक अमर वंडर व डॉ सुनील पाटील यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने, जसे की ताडासन, वृक्षासन, हास्यासन, त्रिकोणासन आणि सूर्यनमस्कार यांचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
उपमुख्याध्यापक ए एन सोनवणे सर यांनी त्यांच्या स्वागत सत्कार केला.
यासोबतच, सूर्यनमस्काराचे फायदे, श्वसनाचे महत्त्व आणि ध्यानधारणेचे फायदे याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी उत्साहाने या कार्यक्रमात भाग घेतला. त्यांनी योगासनांचे विविध प्रकार शिकून घेतले आणि त्यांचे फायदे अनुभवले.
कार्यक्रमाच्या शेवटी, विद्यार्थ्यांना योग केल्याने मिळणाऱ्या शारीरिक आणि मानसिक फायद्यांविषयी माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांमध्ये योगाबद्दल जागरूकता आणि सकारात्मक दृष्टिकोन दिसून आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उपशिक्षक हेमंत पाटील सर यांनी केले