नवापूर तालुक्यातील खांडबारा रेल्वे स्टेशनवरून अज्ञात व्यक्तीने युवतीस पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. १८ वर्षीय युवती ११ जून रोजी रात्री १०:३० वाजता खांडबारा रेल्वे स्टेशनवर गेली होती. या ठिकाणाहून तिला अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवून पळवून नेल्याचे समोर आले. पालकांनी तिचा शोध घेऊनही ती मिळून आली नाही. याप्रकरणी पालकांनी विसरवाडी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे