त्रिशुल ता अक्राणी यांनी येथे सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाचे फायबर स्ट्रक्चर शाळेच्या कामावरून पालकमंत्र्यासमोरच तक्रारीच्या पाडा..
जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीत आमदार आमश्या पाडवी संतापले -पालकमंत्री माणिकराव कोकाटेंसमोरच अधिकाऱ्यांना खडसावले..
नवापूर प्रतिनिधी-हेमंत पाटील-
नंदुरबार जिल्हा परिषदेत नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री मा ना.डाॅ.माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली यावेळी अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या पाडवी यांनी त्रिशुल ता अक्राणी यांनी येथे सुरू असलेल्या निकृष्ट दर्जाचे फायबर स्ट्रक्चर शाळेच्या कामाविषयी अधिकारी व अभियंता यांना खडसावले
धडगाव येथे महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना च्या आढावा बैठकीसाठी आमदार आमश्या पाडवी हे धडगाव येथे गेले होते या वेळी माजी शिक्षण समिती सभापती तथा शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश पराडके यांनी त्रिशुल येथे सुरू असलेल्या शाळेच्या कामाची पाहणी करण्यासाठी आमदार आमश्या पाडवी यांना विनंती केल्यावर आमदार पाडवी यांनी त्रिशुल येथील फायबर स्ट्रक्चर शाळेच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी केली असता अतिशय निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरले जात असुन या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे मोजमाप न करता ओबळढोबळ काम सुरू असून अभियंता सुध्दा या ठिकाणी कधी गुणवत्ता तपासणी करण्यासाठी आले नसल्याने निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत थेट पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत या बाबत तक्रार करत घटनास्थळावरील फोटो व व्हिडिओ थेट पालकमंत्री यांना दाखवले यावेळी सर्व शिक्षा अभियानाचे अभियंता यांनी सांगितले की त्रिशुल येथे जाण्यासाठी रस्ता नाही म्हणून फायबर स्ट्रक्चर चे काम सुरू आहे परंतु या वेळी आमदार पाडवी यांनी अभियंता ला धारेवर धरले व सांगितले की मी कालच माझ्या गाडीने शाळेपर्यंत जाऊन पाहणी करून आलो आहे सदर अभियंता सभागृहात चुकीची माहिती देत असल्याने त्यांच्या वर कारवाई करण्याविषयी सुचित करुन ठेकेदार, अधिकारी व, अभियंता हे देखभाल व्यवस्थित करत नसल्याने अतिशय निकृष्ट दर्जाचे काम होत असुन फायबर स्ट्रक्चर शाळेचे काम न करता त्या ठिकाणी आर सी सी इमारत मंजूर करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार सह विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते