नंदुरबार तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे घरांसह शेती पिकांचे मोठे नुकसान..
आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी नुकसानग्रस्त भागांची केली पाहणी
नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ तलवाडे, आखातवाडे, खर्दे भागात सायंकाळी व रात्री झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे घरांसह शेती पिकाच मोठा नुकसान झालं. याबाबत माहिती प्राप्त झाल्यानंतर दुपारी चार च्या सुमारास राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी या नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी पडलेली घरे पत्रे उडालेले तसेच वाहनांचा नुकसान झालेल्या नागरिकांनी शासनाकडून भरपाई मिळावी अशी मागणी आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या कडे केली. तसेच पावसामुळे शेती पिकाचा नुकसान झाला असून शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई पंचनामे करून मिळावी अशी मागणी केली. वादळी वारा व अवकाळी पावसामुळे पूर्व भागातील नऊ गावांमध्ये 122 घरांची पडझड झाली आहे तर खर्दे गावात वीज अंगावर पडल्याने निलेश मन्साराम भील वय 24 वर्ष यांचा मृत्यू झाला आहे तर चुलत भाऊ दिनेश बन्सीलाल भील हे जखमी झाले आहेत. आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास खर्दे गावात मयत निलेश भील यांच्या कुटुंबियांचे आमदार विजयकुमार गावित यांनी सांत्वन करत शासनाकडून मिळणारी आर्थिक मदतीचे प्रमाणपत्र देण्यात आले. प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष दिपक पाटील वैंदाणे गावचे सरपंच डॉ मनोज गिरासे सामाजिक कार्यकर्ते सागर तांबोळी खर्दे गावचे सरपंच नितीन पाटील तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार नितीन पाटील महावितरण चे अधिकारी कार्यकारी अभियंता अतुल गायधनी उप कार्यकारी अभियंता अशोक पाटील कृषी विभागाचे अधिकारी तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी तलाठी ग्रामसेवक तसेच ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते. या सर्व पाहणीनंतर आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी तलाठी ग्रामसेवक तसेच कृषी अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे पूर्ण करून अहवाल शासनाला देण्यासंदर्भात सूचना केल्या.