आमदार डॉ विजयकुमार गावित यांचे नेतृत्व व कार्यशैलीवर विकासात्मक कामे पाहता बोरी गावी एका कार्यक्रमात असंख्य लोकांच्या भाजपात प्रवेश
नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागात मागील अनेक वर्षांपासून गाव पाड्यांवर कुठलाही विकास काँग्रेसचे आमदारांनी तसेच विद्यमान आमदारांनी केला नाही. यामुळे या अति दुर्गम भागातील बोरी चिखली बिलगाव गेंदा माळ सावऱ्यादिगर गुंडान चाफळा या गावातील केवळ दहा पंधरा किंवा वीस काँग्रेस आणि शिवसेना पक्षातील कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश न करता अख्खाच्या अख्या गावाने भारतीय जनता पक्षात माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या नेतृत्वावर कार्यशैलीवर विकासात्मक कामे पाहता बोरी गावी एका कार्यक्रमात प्रवेश केला आहे. या प्रवेश सोहळ्यात जणू एखाद्या योजनेसाठी जशी लांबच लांब राग लागते त्याच पद्धतीने विविध पक्षातील कार्यकर्त्यांची भारतीय जनता पक्षात प्रवेशासाठी रांग लागली होती. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे नंदुरबार तालुकाध्यक्ष दीपक पाटील धडगाव तालुकाध्यक्ष पिंट्या पावरा सामाजिक कार्यकर्ते सुभाष आप्पा पावरा भीमसिंग पाडवी माजी नगराध्यक्ष लतिष मोरे रमेश वसावे बोरी गाव ग्रामपंचायत सदस्य रेल्या पावरा सुकलाल पावरा शिवाजी पावरा रायसिंग पावरा प्रताप पावरा सीमा पावरा गोविंद पावरा गण्या पावरा आकाश पावरा हेमंत पावरा विशाल पवार सरपंच दिलीप पावरा बिभीषण पावरा आधी उपस्थित होते....