Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

नगर पालिका निवडणुकीची चाहूल- प्रभाग रचना करण्याचे राज्य सरकारचे आदेश

नगर पालिका निवडणुकीची चाहूल- प्रभाग रचना
करण्याचे राज्य सरकारचे आदेश
 मुंबई-स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टोबरसह नोव्हेंबरमध्ये होण्याची दाट शक्यता असून या अनुषंगाने महापालिका, नगरपालिका आणि‌ नगर पंचायतींना प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.
नगरविकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अ, ब आणि क वर्ग महानगरपालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश सरकारने देण्यात आले
आहेत. ही रचना झाल्यानंतर लवकरचं  निवडणूकांचे वेळापत्रकही जाहीर होणार आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका
तीन ते चार वर्षांपासून रखडलेल्या आहेत. त्यामुळे
या ठिकाणी सध्या प्रशासक नेमलेले आहेत मात्र
आता आगामी काळात निवडणूक पार पडण्याची
शक्यता आहे. त्यामुळेच प्रभाग रचना करण्याचा आदेश सरकारने दिला आहे.महापालिकांची प्रभाग रचना बदलणार राज्यातील पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, वसई विरार, छत्रपती संभाजीनगर, कल्याण डोंबिवली,
अमरावती,अहिल्यानगर, अकोला, कोल्हापूर, सोलापूर,सांगली-मिरज-कुपवाड, मिरा भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी, जळगाव, नांदेड-वाघाळा, 

या महापालिकांची प्रभाग रचना बदलणार आहे.

ड वर्गातील महापालिकेतील प्रभाग रचना---
ड वर्गातील महापालिकेत प्रभाग रचना ठरवताना शक्यतो सर्वच प्रभाग चार सदस्यांचे करायचे आहेत मात्र सर्वच प्रभाग चार सदस्यांचे होत नसल्यास एक प्रभाग तीन अथवा 5 सदस्यांचा होईल किंवा दोन प्रभाग 3 सदस्यांचे होतील. यात अमरावती, अहिल्यानगर, अकोला, कोल्हापूर,सोलापूर,संगाली-मिरज-कुपवाड, मिरा भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी-‌निजामपूर, जळगाव, नांदेड, धुळे, मालेगाव, लातूर, चंद्रपूर, परभणी, पनवेल, इचलकरंजी आणि जालना या महापालिकेचा समावेश आहे.अ वर्ग‌ महानगरपालिका - पुणे, नागपूर ब वर्ग महानगरपालिका - ठाणे, नाशिक, पिंपरी-चिंचवड-क वर्ग महानगरपालिका - नवी मुंबई, वसई-विरार,‌ छत्रपती संभाजीनगर, कल्याण डोंबिवली मुंबईतील प्रभाग रचना बदलणार नाही,मुंबई मध्ये जुन्याच प्रभागानुसार निवडणुका होणार आहेत. मुंबई महानगर पालिकेमध्ये 227 एकसदस्यीय प्रभाग रचना करण्यात येणार आहे.मात्र इतर सर्व महापालिकांमध्ये चार सदस्यांचे
प्रभाग असणार आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.