Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

शिवस्वराज्य दिन;पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटेंनी केले छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

शिवस्वराज्य दिन;पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटेंनी केले छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन

नंदुरबार, दिनांक 6 जून 2025 (जिमाका) 
शिवस्वराज्य दिनाच्या औचित्याने आज राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी आज छत्रपती शिवाजी महारांजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. 
जिल्हा परिषद येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात माजी मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित, आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ. मित्राला सेठी, जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) पांडूरंग कोल्हे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वंदना वळवी, माध्यमिक चे प्रवीण अहिरे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष वकील पाटील, अभिजित मोरे, रविंद्र पावर यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुख, कर्मचारी तसेच शिक्षक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. 
ढोलताशांच्या गजरात अत्यंत उत्साही वातावरणात शिवप्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या प्रांगणात भगवा स्वराज्य ध्वजसंहितेनुसार ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारण्यात आली. यावेळी श्रॉफ हायस्कूल (नंदुरबार) च्या संगीत पथकाने राष्ट्रगीत व राज्यगीत सादर केले. तसेच डॉ. काणे गर्ल्स हायस्कूल च्या विद्यार्थिनींनी जिजाऊंच्या लेकी या उपक्रमांतर्गत योगासनाच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महारांजांना आगळ्यावेगळ्या पद्धतीने अभिवादन करून उपस्थितांची मने जिंकली. 
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. युनूस पठाण यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कलाशिक्षक चंद्रशेखर चौधरी, हेमंत पाटील, समग्र शिक्षा अभियानाच्या मनीषा पवार, विद्या थोरात, रत्ना विसपुते, शितल भदाणे दिनेश कढरे, संजय पाटील, ज्ञानेश्वर बोरसे, महेंद्र अहिरे, प्रवीण पवार, इस्राईल सैय्यद, डॉ. गिरीश पवार, योगेश रघुवंशी, मयुर वाणी, स्वप्निल पाटील यांनी सहभाग घेतला होता. 

छत्रपती शिवाजी नाट्यमंदिर येथे करण्यात आले अभिवादन
जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमानंतर कृषिमंत्री तथा पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी शिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी माजी मंत्री तथा आमदार डॉ. विजयकुमार गावित, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. 
००००००००००

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.