नवापूर तालुक्यातील करंजी खुर्द गावात काल रात्री मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस, वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाने हजेरी लावली. रात्री साधारणपणे १२ वाजताच्या सुमारास विजेचा लपंडाव सुरू असताना, याच दरम्यान यशब गिरीश गावित यांच्या घरावर अचानक वीज कोसळली.ही घटना घडली तेव्हा घरातील सर्व सदस्य गाढ झोपेत होते. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वीज कोसळल्यामुळे घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. घराच्या भिंतींना तडे गेले असून इतरही बरंच नुकसान झाल्याचं चित्र आहे.या अनपेक्षित नैसर्गिक आपत्तीमुळे गावित कुटुंबाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. आता यशब गावित आणि त्यांचं कुटुंब शासनाकडून या झालेल्या नुकसानीची भरपाई लवकरात लवकर मिळावी अशी अपेक्षा करत आहेत. अशा नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. गेल्या काही दिवसापासून प्रचंड उखाड्याने हेरान झालेल्या नवापूर करांना दुपारी झालेल्या पावसाने दिलासा मिळाला. विजेच्या लपंडाव सुरू झाला आहे.