नवापूर पोलीस ठाण्याचे नवे पोलीस निरीक्षक म्हणून अभिषेक पाटील यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी कार्यरत असलेले पोनि शिवाजी बुधवंत यांची बदली छत्रपती संभाजीनगर येथे झाल्यानंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे.गेल्या काही वर्षांपासून दीर्घकाळ कार्यरत राहणारा अधिकारी मिळत नव्हता. आता नियुक्त झालेले अभिषेक पाटील हे युवा आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखले जात असल्याने अवैध
धंदे, दारू तस्करी, गुन्हेगारी प्रवृत्ती यांच्यावर कठोर कारवाई करतील व सामान्य जनतेत सुरक्षितता प्रदान करतील अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.