शिवसेना उपनेते व नंदुरबार जिल्हा नवनिर्वाचित संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या नवापूर तालुका प्रथम दौरा संपन्न..
नवापूर शिवसेना उबाठा पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष..
नवापूर तालुक्यातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे नंदुरबार जिल्हा नवनिर्वाचित संपर्क प्रमुख गुलाबरावजी वाघ संपूर्ण नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर असताना नवापूर तालुक्यातील शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना,युवासेना पदाधिकारीसह शिवसैनिक,युवासैनिक कार्यकर्ते बैठक आयोजित करण्यात आली यावेळी सर्व प्रथम छत्रपती शिवराय यांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली व नवनिर्वाचित संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांना नवापूर शिवसेना युवासेना तर्फे शाल ,श्रीफळ व गुलाबगुच्छ देऊन सत्कार व स्वागत करण्यात आले, यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख दिपक गवते,जिल्हाप्रमुख अरुण चौधरी,उपजिल्हाप्रमुख हसमुख (गोटू) पाटील यांनी देखील मनोगत व्यक्त केले या बैठकीचे प्रमुख संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ पदाधिकारीसह शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. यावेळी तालुका प्रमुख कल्पित नाईक, शहर प्रमुख अनिल वारुळे, युवासेना उपजिल्हाधिकारी दिनेश भोई युवासेना तालुका प्रमुख किशन शिरसाठ, शिवसेना तालुका संघटक देवका पाडवी,युवासेना शहर अधिकारी पवन पाटील उपशहर प्रमुख सचिन चौधरी.मनोहर चौधरी, फिरोज कुरेशी विसरवाडी प्रमुख प्रमोद वाघ राहुल गिरासे आकाश गावित भटु पाटील सकेत पाटील मुसा काकार उपस्थित होते.सुत्रसंचालन अनिल वारूडे यांनी केले आभार किशन शिरसाठ यांनी मानले