घरफोडी करुन चोरुन नेलेला 1,52,650 रुपये किंमतीचा ऐवज हस्तगत..एक विधी संघर्षग्रस्त बालक ताब्यात.-नवापूर पोलिसांची कारवाई.
नवापूर, ता.२४
शास्त्रीनगर येथे घरफोडी करून चोरून नेलेला १ लाख ५२ हजार ६५० रुपयांचा ऐवज नवापूर पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणात विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ता. २२ जूनला जयेश शंकर वसावे ( वय ३२) यांच्या घरी रात्री दहा ते सकाळी सहा दरम्यान अज्ञात चोरट्याने मागच्या दरवाज्याची कडी तोडून प्रवेश केला. त्यानंतर घरातील दोन मोबाईल, सोन्याचे दागिने व घड्याळ असा ऐवज चोरीस गेला होता. श्री वसावे यांच्या तक्रारीवरून नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तपासादरम्यान शास्त्रीनगरमधील एका अल्पवयीन मुलावर संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी संशयित बालकाला ताब्यात घेतले असता त्यांनी आपला गुन्हा कबूल केला.पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस.अप्पर अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अभिषेक पाटील, उपनिरीक्षक भाऊसाहेब लांडगे, पोलिस हवालदार अमोल जाधव, दिनेश कुमार वसुले, शिपाई दिनकर चव्हाण, दिनेश बाविस्कर, संजय गावित, महिला पोलिस नाईक भारती आगळे यांच्या पथकाने कारवाई केली. नागरिकांनी घरांबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, असे आवाहन पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी
केले आहे.