नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल येथे"शालेय प्रवेशोत्सव: विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पहिले पाऊल"
शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरुवात, प्रवेशोत्सव संपन्न"
नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेत नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रभात फेरी, आणि विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.नवीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.मुख्याध्यापिका कमल कोकणी मॅडम उपमुख्याध्यापक ए एन सोनवणे सर व शिक्षकांनी नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत केले आणि त्यांना शाळेच्या नियमांविषयी माहिती दिली.
यावर्षी, शाळेने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक आणि सह-शैक्षणिक उपक्रमांचे नियोजन केले आहे. यात क्रीडा, कला, आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे. शाळेने पालकांनाही आवाहन केले आहे की, पाल्यांना दररोज शाळेत पाठवावे त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणात सक्रियपणे सहभागी व्हावे.आज दि.१६ जुलै रोजी सकाळी शाळेच्या प्रवेशद्वारा जवळ शाळेच्या मुख्याध्यापिका कमल कोकणी मॅडम, उपमुख्याध्यापक ए एन सोनवणे, उपप्राचार्य राजेंद्र कुलकर्णी,पर्यवेक्षक हरीश पाटील सर, पर्यवेक्षक जी.डी. सूर्यवंशी सर,जगदीश वाघ सर, ज्येष्ठ शिक्षक आर के पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प व चॉकलेट वाटप करून त्यांचे स्वागत केले. बँडपथकाच्या तालावर प्रभात फेरी काढण्यात आली.
शैक्षणिक साहित्य वाटप:
नवापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष धर्मेशभाऊ पाटील व संचालक महेंद्रभाऊ चव्हाण यांच्या हस्ते नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना पोषण आहारासह मिष्ठांन देण्यात आले.
पालक-शिक्षक संवाद:
पालकांना शाळेच्या कामकाजाविषयी माहिती देण्यात आली आणि त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.
समारोप:----
शाळा प्रवेशोत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शाळेने यावर्षीही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असल्याचे प्राचार्य कमल कोकणी मॅडम यांनी सांगितले.