नवापूर प्रतिनिधी
तहसील कार्यालयात सकाळी 11 वाजता नवापूर तालुका लोकशाही दीन संपन्न झाला
लोकशाही दिनात टर्नल प्लॉट कडील नित्कृष्ट दर्जाचे डांबरी करण केल्याने रस्त्यात खड्डे पडले असून या रस्त्याची चौकशी करावी तसेच नगर परिषद घनकचरा डेपो मधील तीन ते चार लाख रुपये किमतीच्या इलेक्ट्रिक मोटार चोरी झाल्याचे दाखविण्यात आली असून पोलिसात तक्रार किंवा फिर्याद दिली नसल्याने तत्कालीन मुख्याधिकारी,आरोग्य निरीक्षक,जबाबदार ठेकेदार यांची चौकशी करून शासनाचे झालेल्या नुकसानीची भरपाई करून घ्यावी तसेच दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्या बाबत तक्रारी दाखल झाल्या आहेत. लोकशाही दीन तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्या अध्यक्षतेत घेण्यात आला
लोकशाही दिनात मोजकेच अधिकाऱ्याची उपस्थिती दिसून आली होती यावेळी नगर परिषद बांधकाम इंजिनियर यांना नवापूर शहरातील काँक्रिट रस्ते दुरुस्ती बाबत प्रश्न उपस्थित केला असता नगर परिषद बांधकाम इंजिनियर विवेक भामरे यांनी अरेरावी करत उत्तर देण्यास टाळा टाळ केल्याने तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी संबंधित अधिकाऱ्याचे कान टोचत जिल्हाधिकाऱ्या कडे याबाबत तक्रार करणार असल्या बाबत म्हटले आहे या वेळी मुख्याधिकारी मयूर पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता चौधरी सह मोजके तालुका अधिकारी उपस्थित होते