आज, श्री रामकृष्ण उदेसिंग पाटील (रामुभाऊ) यांचा वाढदिवस आहे. श्री रामकृष्ण पाटील हे एक असे व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी आपले जीवन सामाजिक आणि धार्मिक कार्यासाठी समर्पित केले आहे. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी कमी वयात कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत अनेक वर्षांपासून सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. फक्त पद न मिरवता प्रत्यक्ष कार्यात आपले योगदान दिले.त्यांनी केलेल्या कार्यामुळे, अनेक लोक त्यांच्या ऋणात आहेत. राजपूत समाजाचे अध्यक्ष व साईबाबा मंदिराचे उपाध्यक्षपद ते यशस्वीपणे सांभाळत आहेत. फोटो सेशन व प्रसिद्धीपासून दूर राहून काम करण्यात त्यांना धन्यता वाटते.
आज, या खास दिवशी,मी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांचे आरोग्य
चांगले राहो, त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांचे सामाजिक आणि धार्मिक कार्य असेच चालू राहो, हीच साईबाबा चरणी प्रार्थना..!
चांगले राहो, त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांचे सामाजिक आणि धार्मिक कार्य असेच चालू राहो, हीच साईबाबा चरणी प्रार्थना..!
🍰💐🍰💐🍰💐🍰💐
--------------------------------------- -----
शुभेच्छुक-
हेमंत विक्रम पाटील
नवापूर
-----------------------------------------------