Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

क्रुझरचा अपघात : बोदवडच्या १३ पैकी दोन खेळाडूंवर काळाचा घाला-अपघातात ११ जखमी, जळगाव जिल्ह्यात पसरली शोककळा

क्रुझरचा अपघात : बोदवडच्या १३ पैकी दोन खेळाडूंवर काळाचा घाला-अपघातात ११ जखमी, जळगाव जिल्ह्यात पसरली शोककळा

जळगाव/प्रतिनिधी :
पुणे येथे क्रिकेटचा सामना पाहून घरी परतणाऱ्या खेळाडूंच्या वाहनाच्या झालेल्या अपघातात १३ पैकी दोन जणांचा मृत्यू तर ११ जण किरकोळ जखमी झाल्याची घटना सोमवारी, ९ जून रोजी अहिल्यानगर-संभाजीनगर महामार्गावर घडली. अपघातातील मयत बोदवड तालुक्यातील केसरी स्पोर्ट ॲकॅडमीचे खेळाडू होते. अपघातामुळे जळगाव जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

पुण्यातील गहुंजे येथे एमपीएल क्रिकेट सामना सुरु आहे. हा सामना पाहण्यासाठी बोदवड येथील केसरी स्पोर्ट अकॅडमीचे १३ खेळाडू गेले होते. सामना आटोपल्यानंतर हे खेळाडू क्रुझरने (क्र.एमएच २० डीजे ४८३४) घराकडे परतत होते. सोमवारी पहाटे ५ वाजून १५ मिनिटांनी उस्थळ दुमाला गावाच्या हद्दीत मागून भरधाव येणाऱ्या ट्रकने त्यांच्या क्रूझरला जबर धडक दिली. अपघातात प्रथमेश योगेश तेली (वय १४, रा. जामठी दरवाजा, बोदवड) हा जागीच ठार तर वृषभ बबन सोनवणे (वय १६, रा. बोदवड) याचा उपचारावेळी मृत्यू झाला. जखमी झालेले ११ खेळाडू नेवासा फाटा येथील रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

जखमींना नेवासा फाटातील रुग्णालयात केले दाखल

अपघाताची माहिती मिळताच नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तात्काळ मदतकार्य करीत जखमींना रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पुढील तपास पोलीस करीत आहेत. अपघाताची माहिती मिळताच बोदवड येथील नगरसेवक भरत आप्पा पाटील यांनी नेवासा पोलीस स्टेशनला संपर्क केला. त्यानंतर मयत मुलाच्या आई–वडिलांना अपघाताची माहिती दिली. त्यानंतर संबंधित मुलांचे नातेवाईक अहिल्यादेवी नगरकडे रवाना झाले. घटनेमुळे बोदवड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.