Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

घरफोडीचे 03 गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश

घरफोडीचे 03 गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश..पकडण्यात आलेल्या सराईत आरोपीवर विविध जिल्हयात तब्बल 38 गुन्हे दाखल असुन 43,000 रुपये रोख रक्कम तसेच इतर मुददेमाल हस्तगत...


नवापूर प्रतिनिधी -
दि. 28/06/2025 रोजी उपनगर पोलीस ठाणे हद्दितील फिर्यादी श्री. मुकेश मच्छींद्र चौधरी, व्यवसाय- हॉटेल‌ मॅनेजर, रा.भाट गल्ली, शनिमांडळ जवळ, ता. जि. नंदुरबार हे काम करीत असललेल्या शहरातील हॉटेल हिरा गार्डन येथे छताचा पत्रा उचकावून कोणीतरी अज्ञात इसमाने अनाधिकृतपणे हॉटेलमध्ये प्रवेश करुन रोख रक्कम व मुद्देमाल चोरुन नेला बाबत उपनगर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 197/2025 भा. न्या. संहिता कलम 305 (अ),
331(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरु असतांना दिनांक 30/06/2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, हॉटेल हिरा गार्डन येथील चोरी सराईत आरोपी शांताराम प्रताप कोळी, रा. पाडसे ता. अमळनेर, जि. जळगाव याने केली‌ असुन तो सध्या नंदुरबार शहरातील बस स्थानक परिसरात फिरत आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळालेवरुन‌ पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शना खाली स्था.गु.शा.पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी
स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला कारवाई कामी रवाना केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाकडून मिळालेल्या गोपनिय माहितीचे वर्णनाप्रमाणे बस स्थानक परिसरात सराईत आरोपी नामे शांताराम प्रताप कोळी याचा शोध सुरु असता तो बस स्टँन्ड परिसरात मिळून आला. त्यास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव शांताराम प्रताप कोळी, वय- 41 वर्षे, रा. रुबजु नगर, अमळनेर, ह. मु. पाडसे ता. अमळनेर, जि. जळगांव असे सांगितले. त्याची अंगझडती घेता त्याचे ताब्यातुन एक रेडमी कंपनीचा मोबाईल तसेच 43,000/- रुपये रोख रक्कम मिळुन आली. तसेच त्याचे ताब्यातील बॅगेची झडती घेतली असता त्यात एक CCTV DVR देखील मिळुन आला आहे. सदर इसमाकडे मिळुन आलेल्या मुद्देमालाबाबत विचारपुस करता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यास स्था. गु. शा. पथकाने विश्वासात घेऊन विचारपुस केली असता त्याने दोन दिवसांपूर्वी वर नमुद उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील हॉटेल हिरा गार्डन येथे पत्रा उचकावून चोरी केले असल्याचे सांगितले. तसेच त्याने याच हॉटेलमध्ये मागील वर्षी देखील पत्रा उचकावून 42,000/- रुपये रोख रक्कम व एक DVR चोरी केले असल्याची कबूली दिली असुन त्यावेळी देखील उपनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर इसम हा सराईत असल्याने त्याची अधिक सखोल चौकशी करता त्याने 7 ते 8 दिवसांपूर्वी नवापुर शहारात‌ रात्रीचे वेळी एका दारुचे दुकानाचा पत्रा उचकावून 25,000/- रुपये रोख रक्कम चोरी केली असल्याचे देखील सांगितले आहे. तरी सदर आरोपीस उपनगर पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आले असुन गुन्हयांचा पुढील अधिक तपास सुरु आहे. तरी वर नमुद सराईत आरोपीकडुन एकुण 56,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल त्यात रोख रक्कम, मोबाईल व DVR असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन त्यामध्ये 1. उपनगर पोलीस ठाणे गुरनं. 197/2025 2. उपनगर पोलीस ठाणे गु.र.नं. 148/2024 तसेच 3. नवापुर पोलीस ठाणे गु.र.नं.‌406/2025 असे तीन गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. नमुद सराईत आरोपी शांताराम प्रताप कोळी हा रेकॉर्डवरील आरोपी असुन त्याचेवर घरफोडी व चोरीचे विविध जिल्हयात तब्बत 38 गुन्हे दाखल असुन त्याबाबतची लिस्ट सोबत जोडण्यात आली आहे.सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक श्री. आशित कांबळे, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, तसेच पोहेकॉ / मुकेश तावडे, दादाभाई वाघ, बापू बागुल, पोना/मोहन ढमढेरे, पोशि/ अभय राजपुत
अशांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.