रस्त्याचा खड्डयान मध्ये 'बेशरमीचे वृक्ष लाऊन नवापूरकरांचे आंदोलन..!!
अखेर चक्क खड्डयांमुळे करावे लागले नवापूरकरांना आंदोलन.. जनतेच्या आंदोलनामुळे खड्डे बुजले जाणार
नवापूर शहरातील खड्डयांनी हैराण झालेल्या नवापूरकरांनी आज अनोख्या आणि तीव्र आंदोलनाच्या माध्यमातून नवापूर नगरपालिकेचा निषेध नोंदवला.
गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्थेतील रस्ते, वाहतुकीस अडथळा ठरणारे खड्डे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे त्रस्त नागरिकांनी आज मुख्य रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये बसून बेशरमची झाडे लावली आणि “नवापूर नगरपालिका हाय हाय”, “रस्त्यांची कामे झालीच पाहिजेत” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
सिनिअर कॉलेजपासून सुरू झालेल्या या आंदोलनात शहरातील शेकडो नागरिक सामील झाले. आंदोलनकर्त्यांनी प्रत्येक प्रमुख चौकात, खड्ड्यांमध्ये बसून बेशरमची रोपे लावत, खड्ड्यांचे प्रत्यक्ष प्रातिनिधिक रूपांतर केलं. श्री गणपती मंदिरासमोरील मोठ्या खड्ड्याजवळ आंदोलकांनी बांधकाम विभागाचे भामरे यांना बोलावून त्यांना झाडं सुपूर्त करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत वृक्षे ताब्यात घेतली.
यानंतर आंदोलक थेट नवापूर नगरपालिका कार्यालयात पोहोचले आणि मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात घुसून रस्त्यांच्या अवस्थेबाबत उत्तरदेही मागितली.या नंतर मुख्यधिकारी डॉ मयुर पाटील यांनी आंदोलकांना लेखी आश्वसन देत सांगितले की नवापूर शहरातील सर्व रस्त्यावरील खड्डे हे २० दिवसात पुरण्यात येतील तसेच जास्त पाऊस असल्यास त्या दिवशी रस्त्यावरील खडे पुरण्यात येणार नाही यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे असे लेखी आश्वसन मुख्यधिकारी व न पा बांधकाम अभियंता यांनी दिले
या अनोख्या आंदोलनामुळे नवापूर नगरपालिकेवर रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी दबाव वाढला आहे. आंदोलकांनी मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार माजी नगराध्यक्ष,माजी नगरसेवक,विविध पक्षाचे पदधिकारी व नागरीकांनी व्यक्त केला आहे.यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विशाल सोनवणे,उपनिरीक्षक भाऊसाहेब लांडगे,पो हे का निजाम पाडवी,अमोल जाधव,विनोद पराडके,गणेश बच्छे,आदीनी चोख बदोबस ठेवला होता. मोठी लोकसंख्या असलेल्या नवापूर शहरात जनता नागरी सुविधांपासून त्रस्त आहे अशात आंदोलनाच्या मोठ्या गप्पा, चर्चा व व्हाट्सअप युनिव्हर्सिटीतील मोठ्या बाता करणाऱ्या नवापूरकरांची आंदोलनात उपस्थिती अल्प असल्याची बाब दुर्दैवी असल्याचे बोलले जात आहे.
होय, नवापूर शहरात खड्डयांमुळे नागरिकांनी आंदोलन केले
नवापूर शहरात रस्त्यावरील खड्ड्यांच्या समस्येमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि दैनंदिन जीवनात अडचणी येत असल्याने नागरिकांनी या विरोधात आंदोलन केले.
या आंदोलनात,नागरिकांनी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला. खड्डयांची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
खड्डयांमुळे नागरिकांनी केलेल्या आंदोलनाबाबत शहरातील रस्त्यांवरील खड्डे २० दिवसाच्या आत पुरवण्यात येतील असे लेखी आश्वासन इंजिनीयरने आंदोलकाना दिले आहे. त्याप्रमाणे कारवाई केली जाईल. परवापासूनच शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले आहे.सर्व खड्डे बुजविण्यात येतील.. सकारात्मक परिणाम दिसून येतील. नवापूरकरांनी नगरपालिकेला सहकार्य करावे.
@ डॉक्टर मयूर पाटील मुख्याधिकारी नवापूर