नवापूर प्रतिनिधी
मोगरापाडा ता. साक्री येथे सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने १८ वा संगर्ष दिन पाळण्यात आला १४ जुले २००७ रोजी दीडशे पोलीस, ४५० गावं गुंड लोकांनी सुजलन कंपनी च्या वतीने टॉवर उभा करण्यासाठी मोगरपाडा पाचमोवली येथील १८ आदिवासी स्त्री पुरुषांवर लाठी चार्ज करीत दगदफेक करण्यात आली त्यात गंभीर जखमी झाले बादली भर रक्त सांडून पवन ऊर्जा कंपनीचे काम थांबवण्यात आले ते आज पर्यत बंद आहे जो संघर्ष झाला त्याची आठवण ठेवत दरवर्षी हजारो आदिवासी हातात लाल झेंडा घेऊन हजर राहतात ज्या ठिकाणी टॉवर उभा करण्यासाठी खड्डा खोदण्यात आला त्या ठिकाणी लाल झेंडा लावून पूजा करून सत्याचा अखंड गायन करून रॅली काढत मोगरपाडा गावांत प्रबोधन पर जाहीर सभा संपन्न झाली या वेळी कॉम. किशोर ढमाले सत्यशोधक चे राज्य सेक्रेटरी जेष्ठ नेते कॉम. रामसिंग गावीत कॉम. करणसिंग कोकणी होमाबाई गावीत, सत्यशोधक चे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड. आर. टी. गावीत रणजित गावीत शीतल गावीत, दिलीप गावीत लीला ताई वळवी, अशपाक कुरेशी, यशवंत माळचे, रामलाल गवळी, विक्रम गावीत, झिपऱ्या महाराज, मेरूलाल पवार यांनी मार्गदर्शन केले यावेळी दिवंगत कॉमेरेड यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि येणाऱ्या दिवसात मोदी सरकारला शेतकरी विरोधी ३ काळे कायदे मागे घेण्यास भाग पाडले तसं जनसुरक्षा कायदा मागे घेण्यासाठी कंपनी राज, हिटलर शाही विरोधात संगर्ष त्रिव करण्यात येईल असा ठराव करण्यात आला. शेवटी लढगे जितेंगे, जमीन आमची हक्काची नही कोण्या बापाची, चालू छे बाय चालू छे आमणी लढाई चालू छे, फारेष्ट खाते बरखास्त करा, जन सुरक्षा कायदा रद्द करा च्या घोषणा देत समारोप करण्यात आले.