नवापूर प्रतिनिधी--
दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास नंदुरबार ते विसरवाडी रस्त्यावर बालअमराई गावाजवळ धावत्या मोटरसायकलवर अचानक झाड कोसळल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दीपा दावीद गावित (रा. वासदा अंजाने) या महिलेचा जागीच मृत्यू झाला असून, त्यांचा मुलगा दिशांत कुमार दावीद गावित हा गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपा दावीद गावित आणि त्यांचा मुलगा मोटरसायकलने जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. हे झाड धावत्या मोटरसायकलवर कसळल्याने आई-मुलगा रस्त्यावर कोसळले. या घटनेत दीपा गावित यांचा जागीच मृत्यू झाला, तर दिशांत कुमार गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच, ढेकवद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वाहनचालक मुख्यचंद्र बारी आणि कर्मचारी रोहन वसावे, जगदीश पाटील यांनी तात्काळ रुग्णवाहिकेने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी दिशांत कुमारला तातडीने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
मृत दीपा गावित या गरीब आदिवासी कुटुंबातील असल्याने, प्रशासनाने या कुटुंबाला त्वरित आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.