जीवघेणे चौपदरीकरण: धुळे-सुरत महामार्गावर ठेकेदाराची मनमानी आणि बळी पडणारे जीव
नवापूर-धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण हे विकासाचे प्रतीक मानले जात असताना, प्रत्यक्षात ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे, अपूर्ण आणि अपघातांना निमंत्रण देणारे ठरले आहे. ठेकेदाराचा बेजबाबदारपणा आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा महामार्ग नागरिकांसाठी 'मृत्यूमार्ग' बनला असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.
कोंडाईबारी घाटातील पुलाला तडे आणि अपूर्ण काम धोकेदायक ठरत आहे.कोंडाईबारी घाटातील मंदिरासमोर नव्याने उभारण्यात आलेल्या पुलाच्या मध्यभागी मोठे तडे पडले आहेत. सततच्या पावसामुळे हा पूल कमकुवत झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. एक पूल अपूर्ण असल्याने संपूर्ण वाहतूक दुसऱ्या पुलावरून दुतर्फा सुरू आहे, ज्यामुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या धोकादायक परिस्थितीमुळे कधीही मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
खड्डे आणि उंचवट्यांनी भरलेला रस्ता, दुचाकीस्वारांसाठी 'स्लीपिंग ट्रॅप':नवापूरपासून कोंडाईबारी घाटापर्यंतचा रस्ता मोठ्या खड्डयांनी भरलेला आहे. रस्त्याच्या सपाटीकरणाचा अभाव आणि जागोजागी असलेले उंचवटे यामुळे दुचाकीस्वारांसाठी हा रस्ता 'स्लीपिंग ट्रॅप' ठरत आहे. या रस्त्यामुळे मागील काही दिवसांत अपघातांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, अनेक नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत, तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे.
नागरिकांमध्ये संतापाची लाट, तातडीने कारवाईची मागणी:
तालुक्यातील नागरिकांमध्ये या स्थितीबद्दल प्रचंड संताप व्यक्त होत आहे. प्रशासन आणि ठेकेदाराच्या गैरजबाबदार वागण्यामुळे लोकांचे
प्राण धोक्यात आले असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. या गंभीर परिस्थितीची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अपघातग्रस्तांना योग्य भरपाई द्यावी आणि महामार्गाचे काम तात्काळ व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे, अशी एकमुखी मागणी जनतेकडून करण्यात येत आहे.
प्राण धोक्यात आले असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. या गंभीर परिस्थितीची तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अपघातग्रस्तांना योग्य भरपाई द्यावी आणि महामार्गाचे काम तात्काळ व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे, अशी एकमुखी मागणी जनतेकडून करण्यात येत आहे.