कै.बाबुलाल गुलाब पाटील यांच्या स्मरणार्थ आरोग्यदुत हेल्थकेअर सेंटर,नवापूर तसेच दिव्य ज्योती ट्रस्ट तेजस डोळ्यांचे हॉस्पिटल मांडवी गुजरात यांच्या संयुक्त विद्यमाने चालू महिन्यात द्वितीय डोळ्यांचे शिबिर शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी सामाजिक कार्यकर्त्या शालिनीताई पाटील यांच्या नियोजनात व नेतृत्वात आरोग्यदूत हेल्थकेअर सेंटर, महाराणा प्रताप चौक नवापूर जिल्हा नंदुरबार येथे सकाळी 09 ते 01 पावेतो आयोजित करण्यात आले होते
आज रोजी एकूण 134 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून 20 रुग्णांना मोफत ऑपरेशन साठी, जेवण देऊन दिव्य ज्योती ट्रस्ट तेजस डोळ्यांचे हॉस्पिटल मांडवी गुजरात या ठिकाणी लक्झरी बसच्या माध्यमातून पाठविण्यात आले असून सत्तरच्या वर रुग्णांना वीस रुपयांमध्ये अल्पदरात नंबरचे चष्मे वाटप करण्यात आले आहे.त्याचप्रमाणे यापुढे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी येणाऱ्या तारखेला कायमस्वरूपी नवापुरातच भव्य मोफत डोळे तपासणी शस्त्रक्रिया शिबिर हॉस्पिटलचे अधिकृत सेंटर सेवा शुभारंभ करण्यात आले असून नवापुरातील गरजूंना यापुढे मार्च महिन्यात चौथा शुक्रवार 28/03/2025 रोजी याच शिबिराचे पुन्हा आयोजन करण्यात आले आहे आणि कायमस्वरूपी दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी येणाऱ्या तारखेला सकाळी 09 ते दुपारी 01 वाजेपावेतो मोफत डोळ्यांची तपासणी,ऑपरेशन, अल्प दरात चष्मे वाटप तसेच ऑपरेशन पात्र रुग्णांना मांडवी हॉस्पिटल पर्यंत जाण्यासाठी गाड्यांची व जेवनाची व्यवस्था करण्यात येणारआहे तरी आज राहून गेलेल्या रुग्णांनी पुढच्या महिन्यात 28 मार्च 2025 शेवटच्या चौथ्या शुक्रवारी सकाळी नऊ ते दुपारी एक पावेतो पुन्हा या डोळे शिबिराचा लाभ घेऊन आपले डोळ्यांचे आरोग्य चांगले करावे व या सेवेचा नवापुर करांनी लाभ घ्यावा असे आवाहन विश्वनाथ बाबुलाल पाटील संस्थापक,आरोग्यदुत व्यायामशाळा,नवापूर,शालिनीताई विश्वनाथ पाटील ,आरोग्यदुत व्यायामशाळा,नवापूर केतन बाबूलाल पाटील संचालक,आरोग्यदुत व्यायामशाळा नवापूर यांनी केले आहे