राज्य शासनाचे 100 दिवस 7 कलमी कृती आराखडा उपक्रमांतर्गत जिल्हयातील विविध पोलीस ठाणे हद्दीतील
नागरिकांचे काही तक्रारी / समस्या असल्यास त्याचे लागलीच निवारण होऊन नागरिकांचा वेळ वाचावा व सोशल पोलिसींगचे माध्यमातुन जनतेशी संवाद साधता यावा, या उददेशाने नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.श्रवण दत्त.एस यांनी प्रत्येक शनिवारी जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये नागरिकांसाठी तक्रार निवारण दिन आयोजित करण्याचा स्त्युत्य उपक्रम सुरु केला आहे. सदर उपक्रमास जिल्हयातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे.त्याअनुषंगाने आज रोजी जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये नागरिकांचे वेगवेगळया तक्रारींचे निरसन करुन नागरिकांना मार्गदर्शन केले. सारंगखेडा पोलीस ठाणेयेथील तक्रार निवारण कार्यक्रमात अपर पोलीस अधीक्षक श्री. आशित कांबळे यांनी नागरीकांचे तक्रारींचे निराकरण केले. व इतर पोलीस ठाणे येथे संबंधित उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच संबंधित पोलीस ठाण्याचेप्रभारी यांनी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करुन स्वतः नागरिकांचे तक्रारींची दखल घेत त्यांचे समाधान केले.
आज रोजी आयोजित तक्रार निवारण दिनी जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यात एकुण 141 तक्रारींपैकी 106 तक्रारींचे तात्काळ निवारण करण्यात आले.सदर कार्यक्रम पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक श्री. आशित कांबळे, सहा. पोलीस
अधीक्षक श्री. दर्शन दुगड, नंदुरबार शहर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संजय महाजन, शहादा उपविभागीय पोलीसअधिकारी श्री. दत्ता पवार तसेच विविध पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व स्टाफ यांचे उपस्थितीत पार पडला.