चोरटे दुकानाचे छप्पर फोडून आले खाली-केली चोरी..सहा महिन्यांपूर्वी झालेल्या चोरीचा अद्याप तपास नाही..
नवापूर शहरात पुन्हा दुकान व घरफोड्यांनी डोकेवर काढले आहे. मागे झालेल्या घरफोड्या व दुकान फोड्यांच्या तपास लागत नाही तोच पुन्हा चोरट्यांनी दुकान फोडून 50 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे.
लिमडावाडी परिसरात दुसरी चोरी दिलीप स्वीट मार्ट येथे झाली.त्यानंतर याच परिसरात होलसेल किराणा दुकान असून पहाटे तीन ते चार वाजेच्या दरम्यान दुकानाची शटर फोडून चोरी करण्यात आली. किरकोळ किराणामाल व रोकड असा एकूण 40 ते 50 हजाराचा मालाची चोरी झाल्याचे दुकान चालक दिलीप किसनचंद कोदवाणी यांनी सांगितले. घटनेबाबत त्यांनी तात्काळ आजूबाजूच्या दुकानवाल्यांना बोलावून चोरी झाल्याची माहिती दिली. समोरच असलेल्या कापड दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरा त्यांनी पाहिला त्यामध्ये रात्री तीन वाजेच्या सुमारास दोन चोरटे अंधाराचा फायदा घेत त्यांनी आधी दुकान फोडले. चोरी करून मग त्या दुकानातील माल घेऊन जाताना दिसत आहेत लिमडावाडी भागात एका मागून एक होत असलेला चोरीच्या घटनेमुळे व्यापारी मध्ये घबराट निर्माण झाली आहे. रात्री या भागात अंधार असतो याच्या फायदा चोरट्यांनी घेतला आहे
यापूर्वी नेमीचंद अग्रवाल यांच्या कडे दिवसा ढवळ्या चोरी झाली होती आणि चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात देखील दिसत असताना त्या चोरट्यांच्या अद्याप तपास लागलेला नाही. नवापूर शहरात होणाऱ्या घर फोड्या दुकान फोडी वर आळा केव्हा बसणार असा प्रश्न नवापूरकरांना पडला आहे. पोलिसांनी घर व दुकान फोडी करणारे व मोटर सायकल चोरट्यांच्या तपास लावण्याची मागणी होत आहे.