शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 2 .0 प्रशिक्षण केंद्र आदर्श प्राथमिक शाळा नवापूर येथे जिल्ह्यातील दोघं शिक्षणाधिकाऱ्यांनी भेट घेऊन पाहणी केली तसेच मार्गदर्शन केले व उपस्थित शिक्षक व शिक्षिका यांच्या शी संवाद साधला.पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षणाला शिक्षणाधिकारी माध्यमिक प्रवीण अहिरे तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक श्रीमती वंदना वळवी आणि डायचा प्राचार्य श्रीमती बेलन मॅडम यांनी भेट देऊन पाहणी केली व प्रशिक्षणासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनींना शुभेच्छा दिल्या.
या ठिकाणी सुलभक आणि तालुक्याचे आधिकरी गटशिक्षणाधिकारी रमेश चौरे तसेच शिक्षण विस्तार अधिकारी आर.आर. देसले., रेखा पवार व प्रशिक्षणाचे केंद्र संचालक प्रमुख किशोर रायते यांच्या चांगल्या प्रशिक्षणाच्या चांगल्या नियोजना बद्दल समाधान व्यक्त केले. तसेच ज्या शिक्षकांची मुले जिल्हा परिषद शाळा शिकत आहे त्यांचे आणि तसेच विविध स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे शाळेचे शिक्षक त्यांचे कौतुक करण्यात आले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर पुराणिक वनिता विद्यालय नवापूर यांनी केले तर या प्रशिक्षणाला वेळोवेळी गटशिक्षणाधिकारी आर.बी. चौरे यांनी मार्गदर्शन केले. तालुक्यातील जि.प ,खा. प्रा.तसेच माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक याचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षणाला 364 प्रशिक्षणार्थी व सुलभक 25 आहे.तसेच जेवणाची सोय चांगली करण्यात आली आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रशिक्षणाचे नियोजन केल्याबद्दल शिक्षण क्षेत्रातून समाधान व्यक्त होत आहे