धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे सत्र थांबायला तयार नाही. महामार्ग अपघात मार्ग झाला आहे पुन्हा एकदा अपघात घडला त्याचे झाले असे की धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील चिंचपाडा येथील नवीन रस्ता अपुर्ण काम असलेल्या रस्ता मार्गक्रमण करत असतांना अमळनेर येथील एकाच कुटुंबातील पति पत्नी त्यांच्या मुलगा एक मुलगी असे आपल्या रिक्षा क्रमांक GJ05CY1310 या नंबरच्या रिक्षाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने चार जण गंभीर जखमी झाले
अपघाताची माहिती मिळताच 24 तास मोफत सेवा देणारी रुग्णवाहिका नाणिजधाम जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान रुग्णवाहिकेचे पायलट सुरेश वसावे यांच्या मदतीने विसरवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आले.परंतु या अपघातात गंभीर दुखापत झाल्यामुळे जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथे पुढील हलविण्यात आले आहे.