नंदुरबारमध्ये महिलांच्या स्वावलंबनाला नवी चालना!
जिल्हा प्रशासन आणि उमेद अभियानाच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या ‘मिनी सरस 2025’ प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिलांच्या मेहनतीला आणि गुणवत्तेला मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे सात दिवसांत तब्बल 21 लाख रुपयांची विक्री झाली..75 स्टॉल्स – ग्रामीण उद्योगांची नवी ओळख!
या प्रदर्शनात हस्तकला वस्तू, परंपरागत खाद्यपदार्थ, कपडे, गृहसजावटीच्या वस्तू आणि विविध नाविन्यपूर्ण उत्पादने उपलब्ध होती. नंदुरबारच्या नागरिकांनी या वस्तू मोठ्या प्रमाणावर खरेदी करत महिला उद्योजिकांना प्रेरणा आणि पाठिंबा दिला.
🔹 महिला बचत गटांना व्यवसायवाढीच्या नव्या संधी 🔹
जिल्ह्यातील 18 हजार महिला बचत गटांच्या माध्यमातून 1.80 लाख कुटुंबांना आर्थिक स्थैर्य मिळाले आहे. आता हे गट आपली उत्पादने नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानासोबत डिजिटल बाजारपेठेतही पुढे नेत आहेत.
डिजिटल व्यापाराची सुरुवात.!
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी महिलांना डिजिटल पेमेंट आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर करण्याचे मार्गदर्शन केले. त्यामुळे भविष्यात महिला बचत गटांची उत्पादने मोठ्या ऑनलाइन मार्केटप्लेसवरही उपलब्ध होतील!
प्रशासनाचा ठोस निर्धार – महिलांसाठी आणखी संधी!
पालक सचिव बी. वणूगोपाल रेड्डी, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार, आणि अनेक मान्यवरांनी या प्रदर्शनाला भेट देऊन महिलांच्या उत्पादनांचे कौतुक केले.
महिला गटांना फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून आणखी मोठ्या बाजारपेठांमध्ये संधी मिळणार!
महिला सक्षमीकरणासाठी भविष्यात आणखी मोठे उपक्रम राबवण्याचा जिल्हा प्रशासनाचा संकल्प!
‘मिनी सरस 2025’ – महिला सशक्तीकरणाचा नवा टप्पा!
या प्रदर्शनामुळे महिला उद्योजिकांना आर्थिक स्वावलंबनाचा मजबूत आधार मिळाला असून, भविष्यात अशा उपक्रमांना आणखी बळ मिळावे, यासाठी प्रशासन आणि उमेद अभियान सातत्याने प्रयत्नशील राहणार आहे.
ग्रामीण महिलांनी निर्मित केलेल्या उत्पादनांना नवी बाजारपेठ मिळवून देणाऱ्या या उपक्रमामुळे महिलांच्या कष्टाला नवी ओळख मिळाली आहे..!