नवापूर तालुक्यातील शेही येथे नवापूर तालुक्याचे आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या हस्ते ३३/११ के. व्ही. विद्युत उपकेंद्राचे कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या ३३-११ के. व्ही. विद्युत उपकेंद्रामुळे परिसरातील शेतकरी बांधवांना मोठा लाभ होणार
आहे.यावेळी भूमिपूजनाप्रसंगी माजी जि.प.सदस्य प्रकाश कोकणी, विक्रमसिंग वळवी, माजी पंचायत समिती सभापती राजेश गावित, खांडबारा उपसरपंच योगेश चौधरी, ग्रा.पं. सदस्य वरून गावित,सोनपाडाचे सरपंच हेमंत नाईक, नगारे उपसरपंच अनिल वसावे,
हेमंत नाईक, करंजाळी उपसरपंच रामदास वसावे, अमरसिंग गावीत, सुमन वळवी, जयसिंग गावीत,मगन वळवी, सुनील वसावे, अजय वळवी, हरीश वळवी,मगन वळवी, जयसिंग कोकणी,दीपक कोकणी, करणसिंग वळवी,काशिनाथ वळवी, दिलवर वसावे,नटवर वळवी, जयंत वळवी. मोग्या कोकणी, रणजीत वळवी, दिनेश गावित, तसेच परिसरातील सरपंच, उपसरपंच व शेतकरी बांधव उपस्थित होते.