नंदुरबार जिल्हा रुग्णालयात सुरक्षिततेसाठी मोठे पाऊल
१ कोटी ६६ लाख ८८ हजार रुपये खर्चून उभारलेल्या अत्याधुनिक अग्निरोधक यंत्रणेचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते संपन्न झाले. उद्घाटन सोहळ्यात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, अधिपरिचारिका आणि वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रुग्णालयाची सुरक्षा आता अधिक मजबूत ही अत्याधुनिक अग्निरोधक यंत्रणा रुग्णालयाच्या प्रत्येक विभागात कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे रुग्ण,डॉक्टर्स आणि कर्मचार्यांची सुरक्षितता अधिक मजबूत होणार आहे. जिल्हा प्रशासनाचा अत्यंत स्तुत्य उपक्रमात जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी या नव्या यंत्रणेची पाहणी करताना त्या यंत्रणेची कार्यपद्धती समजून घेतली. तसेच रुग्णालयाच्या सुरक्षिततेसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले. नंदुरबारच्या आरोग्य क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी एक नवीन पाऊल..या महत्वपूर्ण उपक्रमासाठी सर्व संबंधितांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे नंदुरबार जिल्हा आता आरोग्य व सुरक्षिततेच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे!