Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

शिर्वे जिल्हा परिषद शिक्षण परिषद संपन्न

नवापूर तालुक्यातील समूह साधन केंद्र श्रावणी केंद्राची शिक्षण परिषद शिर्वे व शिर्वेपाडा जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी संपन्न झाली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिर्वे येथे शिक्षण परिषदेचे उद्घाटन सरपंच बिंदुताई वसावे, उपसरपंच अरविंद वळवी ग्रामपंचायत सदस्य वीरेंद्र वसावे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा मंगला कोकणी, कारभारी यशवंत वळवी, शिर्वे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोकुळ कोकणी, श्रावणी केंद्राचे केंद्रप्रमुख महेंद्र नाईक, शिर्वे शाळेचे मुख्याध्यापक अनिल अहिरे, शिक्षक ईश्वर गावित शिर्वेपाडा शाळेचे मुख्याध्यापक विलास बेडसे, शिक्षिका ज्योती निकुंभ, ग्यान प्रकाशन फाउंडेशन समन्वयक क्रांती सोनवणे, प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल गावित, गणेश पाडवी, कृष्णा रायते, राजेंद्र वसावे, राजेंद्र कुंभार, बकाराम सूर्यवंशी, दिनेश पाडवी, केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद आदी उपस्थित होते. केंद्रस्तरावर शैक्षणिक वर्षातील गुणोत्तर शिक्षण परिषद, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार यांनी दिलेल्या परिपत्रकानुसार विषयांचे सुलभ सादरीकरण व्हावे याकरिता डायट नंदुरबार यांनी दिलेल्या गूगल ड्राईव्ह संदर्भ साहित्याचा वापर करून शिक्षण परिषदेच्या प्रभावी अंमलबजावणी साठी निपुण भारत अभियान अंतर्गत निर्धारित सुधारित लक्ष प्राप्तीसाठी निपुण प्रतिज्ञा शिक्षण परिषदेच्या सुरुवातीला घेण्यात आली. विषय संचलन मागील शिक्षण परिषदेचा आढावा गुणवत्तेबाबत चर्चा जिल्हास्तरावरून देण्यात आलेल्या पीपीटीच्या आधारे मागवा घेण्यात आला व त्याला जोडून दिलेल्या पीपीटी मधील स्लाईडनुसार गुणवत्तेबाबत आढावा चर्चा घडवून आणण्यासाठी केंद्रप्रमुख महेंद्र नाईक यांनी मार्गदर्शन केले. अध्ययन निष्पत्ती वर्ग पातळीवरील अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावरून देण्यात आलेल्या पीपीटीच्या आधारे विषय गणित आढावा व आवश्यक तेथे सुलभन करण्यासाठी ग्यान प्रकाशन फाउंडेशनच्या समन्वयक क्रांती सोनवणे व केंद्रप्रमुख महेंद्र नाईक यांनी मार्गदर्शन केले. अध्ययन निष्पत्ती आधारित आदर्श पाठ सादरीकरण घेऊन सर्व शिक्षकांमध्ये चर्चा घडवून आणण्यासाठी श्रीमती ज्योती निकुंभ मॅडम यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थी अभिव्यक्तीसाठी वर्गातील माझे नियोजन जिल्हा स्तरावर देण्यात आलेल्या पीपीटीच्या आधारे विशेष सादरीकरण करण्यासाठी सीआरजी सदस्य जयश्री भामरे यांनी मार्गदर्शन केले.अग्निपंख पुस्तक परिचय शैक्षणिक पुस्तकाची निवड करून पुस्तक परिचय घेण्यासाठी मनीषा कोकणी यांनी मार्गदर्शन केले. अध्ययन निष्पत्ती आधारित गटकार्य इंग्रजी विषय जिल्हास्तरावरून देण्यात आलेल्या पीपीटीच्या आधारे प्रभावीपणे सादरीकरण घेऊन प्रत्याभरण देण्यासाठी सुलभक धीरज खैरनार यांनी विषयानुसार गटकार्य घेण्यासाठी मार्गदर्शन केले. शिक्षण परिषदेवरील विषय शंका प्रश्न निरसन करण्यासाठी केंद्रप्रमुख महेंद्र नाईक यांनी अनुधावन घेऊन उपस्थित शिक्षकांचे शंका निरसन करण्यासाठी प्रयत्न केले व प्रशासकीय सूचनांमध्ये गरजेनुरूप आवश्यक त्या प्रशासकीय सूचना जिल्हा परिषद नंदुरबार मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सावनकुमार साहेब यांनी दिलेल्या असर अहवाल आढावा व गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्तेत मागे राहणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढे कसे प्रगत करण्यासाठी प्रयत्न करावे.मूलभूत' असर सर्वेक्षण ३-१६ वयोगटातील मुलांसाठी नोंदणीचा ​​मागोवा घेते आणि ५ -१६ वयोगटातील मुलांचे मूलभूत वाचन आणि अंकगणिताचे मूल्यांकन करते. हे दरवर्षी २००५ ते २०१४ या काळात भारतातील जवळपास सर्व ग्रामीण जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात आले होते. २०१६ च्या सुरुवातीपासून, एक पर्यायी-वर्ष मॉडेल सादर करण्यात आले, जेथे 'मूलभूत' असर सर्वेक्षण वैकल्पिक वर्षांमध्ये आणि अंतर वर्षांमध्ये केले जाते, भिन्न वयोगटांचे आणि, मुलांच्या शिकण्याच्या नवीन पैलूंचे परीक्षण करण्यासाठी भिन्न लेन्स वापरल्या जातात. यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले. श्रावणी केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक भटू बंजारा यांची शिक्षण विस्तार अधिकारी पदी अंकुशविहीर ता.अक्कलकुवा येथे पदोन्नती झाल्याने श्रावणी केंद्रमार्फत शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन शिक्षिका ज्योती निकुंभ यांनी केले व उपस्थितांचे आभार शिक्षक ईश्वर गावित यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.