नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील अनेक प्रकारे शक्कल लढवून गौण खनिज तस्कर विना परवाना वाहतूक करतांना दिसून येत आहेत.अशा गौण खनिज माफिया यांच्यावर कारवाई होईल का.?असे अनेक प्रश्न उपस्थित होतांना दिसत आहेत.तलाव खोलीकरणसाठी कोरीव काम चालू असून सदरील गौण खनिज शेतकऱ्यांना देणे बांधकारक असून मोहिदा त.श.शिवरातील, दोंडाईचा रस्ता,खेतीया रस्ता ,प्रकाशा रस्ता जवळील बक्कळ जमीनीवर खाजगी जागेवर भर करण्यासाठी हजारो ब्रास अवैद्यरित्या गौण खनिज टाकण्याचे काम रात्री अपरात्री वाहतूक सुरु असून परिसरातील नागरिकांच्या भवया उंचावल्या असून सदरील जागेवर गौण खनिज टाकण्याची परवानगी कशी दिली ? व किती ब्रास दिली ? असा प्रश्न आता डोकावत आहे.परंतू गौण खनिज माफिया सर्रास पणे बेधडक रात्री बे रात्री वाहतूक करित दिसून येत आहेत.नागरिकांच्या तक्रारी असुन समोर कूणी नागरिक भिंती अभावी समोर येण्यास तयार नाही.अवैधरित्या गौण खनिज उत्खनन करणारे डोके वर काढू लागले आहेत.असाच एक प्रकार शहादा तालुक्यातील मोहीदे त.श. शिवारात गट नंबर ५०१/२/३,५४१, ५२९, ५३०,५३१ मध्ये भरावा करीता हजारो ब्रासच्या अधिक माती, मुरुम भराव करिता वापरून फक्त शंभर ब्रास मातीची (राॅयल्टी ) परवानगी घेतली असून.वरील मुरूम,माती अवैध रित्या टाकले जात . असून याची संबंधीत अधिकारी चौकशी करतील का ? मंडळ अधिकारी व तलाठी यांना धारेवर धरतील का? असा प्रश्न आता नागरिकांच्या मनात भेडसावत आहे. अशी नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे कि गौण खनिज माफियांवर आशिर्वाद कोणाचा?
असे अनेक प्रश्न उपस्थित होतांना दिसत आहे...