Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

जि. प. उच्च प्राथमिक शाळा लक्कडकोट ता.नवापूर जि. नंदुरबार तसेच जि.प.शाळा‌ हिराफळी येथील विद्यार्थ्यांना छावा चित्रपट दाखविण्यात आला

 लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केलेला तसेच विकी कौशल, रश्मिका मंदाना यांनी छत्रपती संभाजी महाराज व येसेबाई यांची भूमिका असलेला *छावा* चित्रपट  शाळेतील विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. शाळच्या जवळ असलेल्या सोनगड (गुजरात राज्य) येथील कृष्णा मल्टिप्लेक्स येथे संस्कृती चित्रपटगृहात दाखविण्यात आला.

विद्यार्थ्यांना ऐतिहासिक घटना तसेच स्वराज्याबाबतची संकल्पना अधिक स्पष्ट, दृढ व्हाव्यात हा उद्देश 
 हिंदवी स्वराज्य अबाधित रहावे यासाठी राजे संभाजी यांचा संघर्ष, सततच्या लढाया, यातना, भयानक मृत्यू... या सर्व घटनाडोळ्यासमोरून जात असताना प्रत्येक बालमन हळहळले. राजांचा जयजयकार करत साश्रू नयनांनी सर्वांनी चित्रपटगृह सोडले. 

गटशिक्षणाधिकारी रमेश चौरे साहेब, शिक्षणविस्तार अधिकारी किशोर रायते साहेब, केंद्रप्रमुख रामू कोकणी सर याच्या प्रेरणेतून व लोकसहभागातून हा उपक्रम यशस्वी झाला.

आयोजकांनी विद्यार्थ्यांना टिकीटाच्या मूल्यात सूट दिली त्याबद्दल शाळने आभार मानले

 सरपंच वंदनाताई नितीन दादा तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य... यांच्या सहकार्याने व
मुख्याध्यापक सौ. जया नेरे (लक्कडकोट) सविता मराठे (हिराफळी) यांच्या सुनियोजनाने व शिक्षकवृंद पंतू गावीत सर, सारिका तांबोळी मॅम, निलेश देवरे सर, मनिषा मॅम, गावीत मॅम यांनी मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.