नवापूर येथे दुसऱ्या टप्प्यातील शिक्षकांचे क्षमता वृद्धी प्रशिक्षण संपन्न..!
@ प्रशिक्षणातून क्षमता वृद्धी सोबतच गटकार्याच्या माध्यमातून होत आहे प्रात्यक्षिक कार्य.. शिक्षकांच्या व्यक्तिमत्व विकासावर ही दिला जातोय भर..
एनसीइआरटी पुणे,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट), नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण २.० नवापूर येथील आदर्श प्राथमिक शाळा येथे आयोजित करण्यात आले आहे. प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्पा संपन्न झाला.राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अनुषंगाने शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी संपूर्ण राज्यात वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.या धोरणात उल्लेखित केल्याप्रमाणे विद्यार्थी हा शिक्षण व्यवस्थेतील मूलभूत बदलाच्या केंद्र स्थानी असल्याने पायाभूत स्तरा पासून माध्यमिक स्तरा पर्यंत प्रत्येक शिक्षकाचे सक्षमीकरण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.धोरणातील तरतुदी नुसार विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास होण्याच्या दृष्टीने सर्व स्तरांवर शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण २.० निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.गटशिक्षणाधिकारी रमेश चौरे, शिक्षण विस्तार अधिकारी आर आर देसले, रेखा पवार, तालुका समन्वयक तथा शिक्षण विस्तार अधिकारी किशोर रायते यांनी यशस्वीरित्या नियोजन केले आहे.केंद्र समन्वयक किशोर रायते,गटप्रमुख ज्ञानेश्वर पुराणिक,गोविंद वाडीले हे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत.शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण हे जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था (डायट), नंदुरबारच्या प्राचार्य डॉ.भारती बेलन, जिल्हा प्रशिक्षण समन्वयक डॉ. राजेंद्र महाजन, डॉ. वनमाला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.सर्व प्राथमिक,माध्यमिक मुख्याध्यापक आणि शिक्षक सदरचे प्रशिक्षण घेत आहेत.दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणात शिक्षकांच्या व्यक्तिमत्व विकासावरही भर दिला.
प्रशिक्षणातून क्षमतावृद्धी सोबतच गटकार्याच्या माध्यमातून प्रात्यक्षिक कार्य देखील करून घेण्यात आले.
व्यक्तिमत्व विकासावर देखील भर देण्यात आला. प्रशिक्षण कालावधीत रोज सकाळी परिपाठ सोबत राष्ट्रगीत, योगासने,महाराष्ट्र गीत, प्रार्थना यांचे सामूहिक गायन झाले. गटकार्य आणि विविध कृतीयुक्त असे ज्ञानातून आणि मोकळीकांच्या माध्यमातून क्षमता वृद्धी होण्यासाठी मदत होईल अशा आत्म विश्वास प्रशिक्षणार्थीनी व्यक्त केला.
अतिशय गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार असे प्रशिक्षण हे डायट, नंदुरबार मार्फत आयोजित करण्यात आले, या प्रशिक्षणाचा भरपूर आम्हास उपयोग होईल असे प्रशिक्षणार्थींनी यांनी यावेळी सांगितले. दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षणाच्या समारोप संपन्न झाला त्यात केंद्रप्रमुख दिलीप गावित, सीमा काळे, सचिन तांबोळी यांनी मनोगत व्यक्त केले.सुलभक म्हणून सुजीत कोकणी,प्रविण ठिंगळे,गोरख मराठे,विनोद पाडवी, गंगाराम झांजारे,मिलींद जाधव,योगेश पवार,भरत साबळे,बाजीराव शिंदे शरद कुवर,नितीन पाटील,सुनिल सरवदे, गुणवंत गायकवाड,चंदन जाधव,गोविंद वाडीले,महेंद्र अहिरे,मनोहर मेखे, अमोल कांबळे,कांतीलाल वसावे, ज्ञानेश्वर पुराणीक,तुषार पवार,दिनेश खैरनार,विवेक वाडीले,सचिन तांबोळी,दिलीप गावीत,बालकिसन ठोंबरे हे सुलभक म्हणून काम पाहत आहे.