मागील २६ नोव्हेंबर २०२४ रोजी डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक समिती नेमण्यात आली होती मात्र सहकार आयुक्त यांनी १३ फेब्रुवारी रोजी मंत्री सहकार यांचेकडील सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग मंत्रालय मुंबई ३२ यांचेकडील जा. क्र. आरव्हीए -२०२४ प्र. क्र.७२४/१५. स दिनांक ०५/०२/२०२५ नुसार या कार्यालयास कळाल्यावर
साखर संचालक यांचेकडील दिनांक २६/११/२०२४ चे संचालक मंडळ निश्प्रभावित करून प्रशासकीय समिती नियुक्त करण्याचे आदेशास स्थगिती देण्यात आली असल्यामुळे ,प्रशासकीय समिती सदस्य यांनी आज दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ रोजी कारखाना स्थळी उपस्थित राहून कारखान्याचा संपूर्ण पदभार कारखान्याचे चेअरमन भरत माणिकराव गावित व संचालक मंडळ यांच्याकडे सूपृद केले..
यावेळी कारखान्याचे चेअरमन भरत माणिकराव गावित यांनी कारखाना साईट वरील आई देवमोगरा माता मंदिरात जाऊन विधिवत पूजन करून दर्शन घेतले व फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद व्यक्त करण्यात आला..यावेळी कारखान्याचे संचालक मंडळ, राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते..