प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत पंचायत समिती, नवापूर द्वारा आयोजित केंद्रस्तरीय पाककृती स्पर्धेचे आयोजन दि एन.डी.अँड एम.वाय. सार्वजनिक हायस्कूल व शेठ एच.जे.शाह कनिष्ठ महाविद्यालय, नवापूर या शाळेच्या मध्यवर्ती सभागृहात करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर विस्तार अधिकारी किशोर रायते , केंद्रप्रमुख शैलेश राणा यांचे दि एन.डी. अँड एम.वाय. सार्वजनिक हायस्कूल, नवापूर शाळेच्या वतीने मुख्याध्यापक संजयकुमार जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे. त्या धरतीवर महाराष्ट्र शासनाकडील प्राप्त पत्रानुसार प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने अंतर्गत सन 2024-25 या वर्षात पाककृती स्पर्धांचे आयोजन शाळास्तर व केंद्र स्तरावर करणे संदर्भात पत्र प्राप्त झालेले होते. त्या अनुषंगाने नवापुर केंद्रातील एकूण 27 शाळा स्तरावर पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये शाळा स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या अशा सर्व 27 शाळांची एकत्र केंद्रस्तरीय स्पर्धा घेण्यात आली. ज्यामध्ये पुढील प्रमाणे निकष होते. फोर्टीफाईड तांदुळाचा वापर 45 प्रकारचे महत्व, तृणधान्याचा वापर, तृणधान्यातील आहारातील महत्त्व, पाककृतीचा दैनंदिन आहारातील उपयोगिता, पाक कृतीची चव मांडणी, नाविन्यपूर्णता पाककृती बनवण्याची कृती सुलभता व इंधन बचत असे एकूण 50 गुणांक या ठिकाणी देण्यात आलेले होते.या पाककृती स्पर्धेतील प्रथम पारितोषिक जि.प. मराठी मुलांची शाळा, नवापूर, द्वितीय पारितोषिक जि.प.शाळा, घोडजामणे व दि एन.डी. अँड एम.वाय. सार्वजनिक हायस्कूल, नवापूर (संयुक्त) व तृतीय पारितोषिक श्रीमती.प्र.अ.सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल, नवापूर यांना जाहीर करण्यात आले.
सदर पाककृती स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून...
1. इंदुबाई दगा अहिरे (जि.प.शाळा, घोडजामणे)
2. कुंदा अरविंद गावित (आदर्श प्राथमिक शाळा, नवापूर)
3. कमलबेन जिग्नेशकुमार परिख (दि एन.डी. अँड एम.वाय. सार्वजनिक हायस्कूल.)
4. मिनल निलेश पाटील (श्रीमती.प्र.अ.सोढा सार्वजनिक मराठी हायस्कूल, नवापूर)
यांनी काम पाहिले. सर्व उपस्थित परीक्षकांचे दि एन.डी. अँड एम.वाय. सार्वजनिक हायस्कूल, नवापूर येथील शाळेचे मुख्याध्यापक संजयकुमार जाधव यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी किशोर रायते , केंद्र प्रमुख शैलेश राणा व नवापूर केंद्रास्तरावरील सर्व मुख्याध्यापक व उपशिक्षक उपस्थित होते. स्पर्धेतील सर्व सहभागी स्पर्धकांना विस्तार अधिकारी किशोर रायते यांनी मार्गदर्शन केले. सर्व स्पर्धकांना अधीक्षक देसले व गटशिक्षणाधिकारी रमेश चौरे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे उपशिक्षक जितेंद्रकुमार जगताप यांनी केले. व केंद्रप्रमुख शैलेश राणा यांनी सर्वांचे आभार मानले