शासन एकीकडे शिक्षणावर भरमसाठ पैसा खर्च करत असताना दुसरीकडे मात्र दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसत आहे. परीक्षा तोंडावर असताना आदिवासी बस्तीत बत्ती गुल झाल्याच्या घटनेने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होणार आहे
शहादा तालुक्यातील कुकावल गावात आदिवासी वस्तीत कोणाला न सांगता महावितरण मार्फत गावातील खांब वरील तार काडून केबल बसविले असता गावकरीनी कुकवलं सबटेशन वरती आक्रोश मोर्चा काढला. अगोदर प्रत्येक घरात मिटर बसावा नंतर केबल टाका कारण सद्या बारावीची परीक्षा सुरु असून दहावीची परीक्षा ही तोंडावर आली आहे येण वेळीस आदिवासीच्या घरात अंधार केल्याने गरीब आदिवासीचे मुलं अभ्यास कुठे करणार.?आमच्या गरिबांच्या मुलांनी शिकायचं नाही का, केबल टाकण्या आधी प्रत्येक घरात मिटर बसवयला हवे होते तसे न करता केबल बसून एक प्रकारे गरिबांवर अन्याय केला असा जाब विचारण्यासाठी पूर्ण गाव सब स्टेशन कार्यालयावर गेले असता संबंधित अधिकारी यांनी केबल उतरून परत खांब वरती तार बसविन्यात येणार असे आश्वासन दिले. आश्वासन न देता यावर तातडीने कारवाई होणे गरजेचे आहे असे बोलले जात आहे..