नवापूर शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातर्फे शरदचंद्र पवार यांचे निष्ठावंत प्रदेशाध्यक्ष माजी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसा निमित्ताने आज 16 फ्रेब्रुवारी २०२५ रोजी नवापूर शहरातील ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आले व नवापूर शहर व तालुक्याची वतीने हार्दिक शुभेच्छा ही देण्यात आल्या.निष्ठावंत काय असतो आणि कसा असतो याचं उदाहरण म्हणजे जयंतराव पाटील आहेत. शरदचंद्रजी पवार यांच्या विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या सर्व प्रयत्नांना यश मिळो, हीच सदिच्छा आजच्या दिनी अ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. त्या निमित्ताने आज नवापूर ग्रामीण रुग्णालय येते फळ वाटप करण्यात आले. यावेळी नवापूर शहर अध्यक्ष गोलू राजपूत,तालुका युवक अध्यक्ष नयनबाबा वसावे. राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाअध्यक्ष आशिष गावित,जिल्हा सचिव लक्ष्मीमीकांत पाठक. नवापूर तालुका बूथ अध्यक्ष राजेंद्र वसावे.नवापूर शहर उप अध्यक्ष अल्ताफ मिर्जा. नवापूर शहर सचिव राजू गावित. कुणाल नरभवर. यश वसावे.जितेंद्र फुलसिंग वसावे.कल्पेश गावित. रोहन वळवी. प्रदीप मावची.जितेंद्र वसावे आदी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आजी माजी पदाधीकारी उपस्थित होते.