@ अग्निशमन गाडी तब्बल दोन तास उशिरा आल्याने नागरिकांनी केला रोष व्यक्त...
आगीत दोन म्हशी गंभीर- शेती उपयोगी साहित्याची राख रांगोडी अंदाजे पाच ते सात लाखाच्या नुकसान
शहादा तालूक्यातील लोहारा गावातील रामभाऊ ओंकार माळी या शेतकरीच्या गोठ्याला रविवार रोजी दुपारी अचानक आग लागल्याने गावात एकच धावपळ उडाली होती, सरपंच पोलीस पाटील, तसेच ग्रामस्थांच्या मदतीने तब्बल दोन ते तीन तासात आग आटोक्यात आण्यात आली ,शहादा ते लोहारा गावाचे अंतर फक्त पंधरा मिनीटांचं असून गावकरीनी अग्निशामक दलाची गाडी साठी संपर्क केला असता गाडी तब्बल दोन तासांनी उशिरा आल्याने अग्निशमन दलाचा कार्य वर प्रश्न चिन्ह निर्माण होतो ? तोपर्यंत गावकरीनी आग आटोक्यात आणली होती, अग्निशामक दलाची गाडीत फक्त अर्दीच भरलेली होती,अग्निशामकगाडी उशीरा आल्याने गावातील नागरिकांनी रोष व्यक्त केला, यात जीवितहानी झाली असती तर यात यास जबाबदार कोण? असा आरोप करून गावकऱ्यांनी प्रशासनाला जाब विचारला आहे. आगीत गोठ्यात बांधलेल्या दोन म्हशी गंभीर जखमी झाली असून त्यांची प्रकृती चिंता जनक आहे.या आगीत पाईप तसेच ,शेती उपोयोगी साहित्य जाळून खाक झाले गोठ्याचा शेजारील विनोद सरदार पवार कैलास सरदार पवार यांचे घराही आग लागल्याने त्यांचेही लाखोंचे नुकसान झाले आहे. पोलीस प्रशासन व महसूल विभाग घटना स्थळीचा पंचनामा केला असून शेतकरी व गरीब कुटुंबानी लवकरात लवकर भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे...