उन्हाळा सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागात दरवर्षी पाणीटंचाई सुरू होते. पाणीटंचाईच्या झळा आता हळूहळू तालुक्याला बसताना दिसून येत आहे. वाड्या, वस्त्यांना मार्च महिन्यातच पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. काही ठिकाणी तर गावातील महिलांना भरउन्हात पायपीट करून पाणी आणावे लागते. गावात पाणी नसल्यामुळे अनेक कुटुंबीय शेतात स्थलांतर करत असतात.राज्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळच्या जवळ असलेल्या केलापाणी गावात आजही रस्ता नसल्याने इथल्या आदिवासी बांधवांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवाती पासूनच पाणीटंचाईची तीव्र झळा पाहायला मिळत आहेत.चक्क हंडाभर पाण्यासाठी आदिवासी महिलांना चार ते पाच किलोमीटर पर्यंत डोंगर वाटातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहेत साधारण 200 फूट खोल दरीत उतरून आदिवासी महिलांना पिण्याचे पाणी आणावं लागत असल्याचं दुर्दैवी विचित्र सातपुड्याच्या डोंगर रांगामध्ये पाहायला मिळत आहे.यावर शासनाने या भागाच्या सर्वे करून उपाययोजना करणे गरजेचे आहे.
अरे बापरे..चक्क दोनशे फूट खोल दरीत उतरून आदिवासी महिलांना पिण्याचे पाणी आणावे लागते
February 16, 2025
0