कर्मचारी संस्थेच्या वसाहतीत बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या येमेन देशातील नागरिकावर गुन्हा दाखल झाला आहे.यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. अटकेनंतर पोलीसांनी गत दोन दिवसांपासून जामिया संस्थेच्या कार्यालयाची तपासणी केली. सहा तासांपेक्षा अधिक काळ तपासणी सुरु होती. पथकाने महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत.
अक्कलकुवा येथील जामिया शैक्षणिक संकुलाच्या वसाहतीत येमेन देशातील नागरिक खालेद इब्राहिम सालेह अल खदामी व त्याची पत्नी खादेगा इब्राहिम कासीम अल नाशेरी तब्बल ९ वर्षापासून बेकायदेशीर वास्तव्यास असल्याचे समोर आल्यानंतर गुन्हा दाखल झाला. दाम्पत्याने बनावट कागदपत्रे तयार केल्याचे ही समोर आले होते.तपासाधिकारी सहायक पोलिस अधीक्षक दर्शन दुग्गड यांनी खालेद इब्राहिम यालताब्यात घेतले आहे.सायंकाळपासून तपास पथकांनी जामिया शैक्षणिक संकुलासह अस्सलाम
रुग्णालयात भेट देत कागद पत्रांची पाहणी केली होती. पथकांकडून गुरुवारीही चौकशी सुरु होती.२०० पोलीस कर्मचाऱ्यांच्या फौज फाटा जामिया संकुल परिसरात तैनात होता
दोन दिवस वार्षिक पदवी दानवेळी आले विदेशी नागरिक ८ व ९ फेब्रुवारी रोजी जामिया संस्थेत वार्षिक पदवीदान समारंभ झाला. यावेळी देश-विदेशातून अनेकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचीही माहिती पोलिस अधिकारी घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे. अक्कलकुवा पोलीस ठाण्यासह उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाकडून या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी शहरातील संघटना व पदाधिकाऱ्यांनी निवेदने दिली आहेत.