नंदुरबार : परदेशातील नागरिकांना आश्रय देणाऱ्या जामिया ईस्लामिया ईशातुल उलुम संस्थेच्या देशभरातील शाखांमध्ये धाडी टाकून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी येथे केली.जिल्हयातील अक्कलकुवा येथील जामिया ईस्लामिया ईशातुल उलुम या संस्थेत येमन देशाच्या नागरिकांना आश्रय दिल्याने संस्थचे चेअरमन गुलामअली वस्तावनी व त्यांचा मुलगा हुजेफा वस्तावनी यांच्यासह मन देशाचा नागरिक खालेद इब्राहिम सालेहर
अल-खदामी यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ११ फेब्रुवारीला पत्रकार परिषद घेऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे आपण तशी मागणी केली होती. त्या अनुषंगाने जामिया ईस्लामिया ईशातुल उलुम या संस्थेची पोलीस अधिकाऱ्यांनी २०० पोलिसांचा ताफा सोबत घेत सहा तास तपासणी केली. पोलिसांनीक्षसंशयास्पद हालचाली कॅमेऱ्यात टिपल्या आहेत.काही संशयास्पद कागदपत्रे देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत, असे श्री. चौधरी म्हणाले. हे गंभीर प्रकरण असून पोलिसांनी खालेद इब्राहिम सालेहर अल-खदामी याला अटक केली त्याप्रमाणे त्याच्या परिवारातील सदस्यांना तात्काळ अटक करावी. त्यांना बेकायदे शीररित्या आश्रय दिल्याने संस्थेचे चेअरमन गुलामअली वस्तावनी व त्यांचा मुलगा हुजेफा वस्तावनी यांना देखील तात्काळ बेड्या घालाव्यात, अशी मागणी श्री.चौधरी यांनी केली आहे. या संस्थेत आणखी किती विदेशी नागरिक आश्रयास आहेत. त्याची चौकशी तात्काळ करावी. या संस्थेच्या उत्तर प्रदेश,कर्नाटकसह देशभरातील शाखांमध्ये छापे टाकून चौकशी करण्यात यावी, असेही श्री.चौधरी म्हणाले. जामिया ईस्लामिया ईशातुल उलुम संस्था स्थापन झाल्यापासून अब्जावधी रुपयांचा निधी आला आहे.त्याची स्त्रोत तपासण्यात यावा. विदेशी गुंतवणुकीत मुस्लीम राष्ट्रांसह पाकिस्तान, बांग्लादेशातून येणाऱ्या निधीची चौकशी करावी.संस्थेला केवळ शैक्षणिक कामांसाठी निधी मिळतो काय? मिळणाऱ्या निधीचा गैरवापर होतो काय? कश्मीर खोऱ्यातील फुटीर वाद्यांना मदत केली जाते काय? या प्रश्नांची उत्तरे शोधावीत, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे श्री. चौधरी यांनी केली आहे.