नवीन शिक्षण धोरण अंतर्गत विद्यार्थी केंद्रित शिक्षणाला अनुसरून
विविध विषयांवर चार टप्प्यात होणार प्रशिक्षण
शिक्षकांसाठी १० फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत क्षमतावृद्धी प्रशिक्षण
नवापूर येथिल आदर्श प्राथमिक शाळेत नवीन शिक्षण धोरण (NEP) 2020 अंतर्गत शिक्षक क्षमतावृद्धी 2.0 तालुकास्तरीय प्रशिक्षण सुरू आहे.
शालेय शिक्षणाच्या सर्व स्तरातील शिक्षकांचे सक्षमीकरण होणे आवश्यक आहे. त्यानुसार राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण २.० आयोजन राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या अंतर्गत जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था पुणे यांच्यातर्फे करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, राज्य अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत शिक्षण) २०२३, राज्य अभ्यासक्रम आराखडा (शालेय शिक्षण) २०२४, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा, क्षमताधारित मूल्यांकन, संकल्पना आणि कार्यनीती, क्षमताधारित अध्ययन अध्यापन प्रक्रिया अशा विषयांचा समावेश आहे.
सदर प्रशिक्षण चार टप्प्यात असून नवापूर तालुक्यातील एकोणावीस केंद्र त्यामध्ये पहिल्या टप्प्यात 362 शिक्षक व शिक्षिका यांनी दि. 10 ते 14 फेब्रुवारी 2025 कालावधीत प्रशिक्षण पहिला टप्प्यात घेतले. सदर प्रशिक्षणाचा कालावधी 10 फेब्रुवारी ते 10 मार्च या कालावधीत चार टप्प्यात आयोजित करण्यात आले आहे.
सदर प्रशिक्षणासाठी गटशिक्षणाधिकारी आर. बी. चौरे शिक्षण विस्ताराधिकारी आर आर देसले, रेखा पवार तालुका समन्वयक तथा शिक्षण विस्तार अधिकारी किशोर रायते यांनी पहिल्या टप्प्यातील यशस्वीरित्या नियोजन केले आहे.
प्रशिक्षणा दरम्यान भेटीसाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना वळवी व माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी सर्व प्रशिक्षणार्थी शिक्षक शिक्षिका यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. प्रशिक्षणादरम्यान सर्व प्रशिक्षणार्थींना चहा नाश्ता व जेवणाची सोय करण्यात आलेली होती. सदर प्रशिक्षणासाठी सुलभक म्हणून गोविंद वाडीले, ज्ञानेश्वर पुराणिक,प्रवीण ठिगळे,अमोल कांबळे,तृषार पवार,गुणवंत गायकवाड,विवेक वाडिले,महेंद्र अहिरे, योगेश पवार, गंगाराम झांजरे, मिलिंद जाधव, नितीन पाटील आदी एकूण 25 सुलभक प्रशिक्षण देत आहेत...