नंदुरबार(प्रतिनिधी)-रोटरी क्लब ऑफ नंदनगरी, रोट्रक्ट क्लब ऑफ नंदनगरी, डॉ.हेडगेवार सेवा समिती नंदुरबार तसेच रोटरी डिस्टिक्ट ३१४१ व ३१४२ च्या विविध रोटरी क्लबच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात मोफत अस्थीव्यंग सुधारक शत्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण ८५ बालकांची तपासणी करण्यात आली. त्यातून ३० गरजू बालकांची अस्थीव्यंग सुधारक शत्रक्रिया करण्यात आली.
या शिबिराचे उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ.संजय राठोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.वर्षा लहाडे, डॉ.हेडगेवार समितीचे प्रमुख केदारनाथ कवडीवाले, डॉ.मयुरेश वाडके, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२ चे डी.जी.एन.चंद्रदास शेट्टी, डॉ.प्रमोद काळे (मुंबई), रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष इसरार अली सैय्यद, संतोष वसईकर, डॉ.निलेशकुमार वळवी, डॉ.सुबेदार, डॉ.ज्योती बागुल, शिक्षण संस्था चालक संघटनेचे सचिव युवराज पाटील आदी उपस्थित होते.
या मोफत अस्थीव्यंग सुधारक शत्रक्रिया शिबिराच्या आयोजनात रोटरी डिस्ट्रिक्ट ३०६० चे रोटरी क्लब ऑफ नंदनगरी, रोट्रॅक्ट क्लब ऑफ नंदनगरी, डॉ.हेडगेवार सेवा समिती नंदुरबार, रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४१ व ३१४२ चे रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ, देवनार, कॉन्व्हेंटरी फोनिक्स, ठाणे हिल्स, ठाणे ग्रीन सिटी या रोटरी क्लब यांचा देखील समावेश होता. या मोफत अस्थीव्यंग सुधारक शत्रक्रिया पूर्व तपासणी शिबीरात ० ते १४ वयोगटातील मुलांचा समावेश होता. नंदुरबार जिल्ह्यातून या शिबिरात एकूण ८५ बालकांची तपासणी करण्यात आली. त्यातून ३० गरजू बालकांची अस्थी व्यंग (दिव्यांग) सुधारक शत्रक्रिया मुंबई व लंडन येथील तज्ञ डॉक्टरांच्या हस्ते नंदुरबारच्या जिल्हा रुग्णालयात करण्यात आली. सदर मुलांची शत्रक्रिया पूर्व तपासणी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४२ चे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डॉ.मयुरेश वारके, डॉ. हिमांशू बेंद्रे (मुंबई), डॉ.जिंस्या पाटील, डॉ.दिशा शेट्टी, डॉ.संपदा पटवर्धन यांनी केली. या विशेष शस्त्रक्रिया शिबीरासाठी मुंबई व ठाणे रोटरी क्लबचे सदस्य चंद्रहास शेट्टी, पराग पाटील, गणेश केलेसकर, नितीन मोरे, सागर धदास, अनिल मुळे, शैलेश मुळे, प्रशांत आंबेकर, सतीश शेट्टी, संग्राम जोशी, नागेश भट, शिरीष सोनगडकर, सतीश शेट्टी आदी उपस्थित होते. शिबिरासाठी संतोष वसईकर, जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असो. अध्यक्ष सुनील चौधरी, मनोहर धिवरे, डॉ.नितीन पंचभाई यांचे विशेष सहकार्य लाभले. शिबीर यशस्वीतेसाठी रोटरी नंदनगरीचे अध्यक्ष इसरार सैय्यद, सचिव विवेक जैन, जितेंद्र सोनार, प्रीतीश बांगड, रोट्रॅक्ट क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष मयूर जैन, जय गुजराथी, रोट्रॅक्ट क्लब ऑफ नवापूरचे अध्यक्ष यामिन पठाण, राजेश्वर चौधरी, राहुल पाटील, गौरव चौधरी, डॉ.हेडगेवार सेवा समितीचे गिरीश बडगुजर, उमेश शिंदे, गौरव चौधरी आदींनी परिश्रम घेतले.