शहादा तालुक्यातील #डामरखेडा व #प्रकाशा येथील जुन्या पुलांचे नूतनीकरण व नवीन पुलाचे काम १ मे २०२५ पूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी दिले आहेत. आज शहादा तहसिलदार कार्यालयात या संदर्भात झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंता रंजना दळवी, तहसिलदार दीपक गिरासे व उप अभियंता श्री. वानखेडे यांच्या उपस्थितीत ही महत्वपूर्ण चर्चा झाली. जनतेच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रवास सुलभ करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.लवकरच या विकासकामांचा शुभारंभ होणार असून, स्थानिकांना प्रवासात दिलासा मिळणार आहे. आपला विश्वास, आमचा संकल्प..!