नंदुरबार(प्रतिनिधी)-नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबार येथील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षेत यश प्राप्त केले. परिक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून शाळेचे मुख्याध्यापक पुष्पेंद्र रघुवंशी यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
२०२५ या शैक्षणिक वर्षात इलेमेंटरी व इंटरमिजीएट परिक्षेचा निकाल जाहीर झाला असून इलेमेंटी परिक्षेस एकूण २९ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ०८ विद्यार्थ्यांना A अ ग्रेड, १० विद्यार्थीना ब ग्रेड, ११ विद्यार्थींना क ग्रेड प्राप्त झाले. तसेच इंटरमिजीएट परिक्षेत एकूण ३६ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी १० मुलांना अA ग्रेड, १० मुलांना ब ग्रेड आणि उर्वरित १९ मुलांना क ग्रेड प्राप्त झाले आहेत. शाळेचे मुख्याध्यापक पुष्पेंद्र रघुवंशी आणि कलाशिक्षिका वैशाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही परीक्षांचा निकाल १०० टक्के लागला असून परीक्षेचे प्रमाणपत्र शाळेचे मुख्याध्यापक पुष्पेंद्र रघुवंशी, पर्यवेक्षक व्ही.एस.पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.