नवापूर शहरातील कॉलेज रोडवरील नवापूर नगरपालिकेचे टपरी स्टॉल उभारले आहे या ठिकाणी चहा नाश्ता, मिनी बँक कोलड्रिंक, जनरल स्टोअर आशयाच्या एकूण २६ दुकाने आहेत गेल्या आठ-दहा दिवसा पासून या दुकानांमध्ये बुरट्या चोरांनी धुमाकूळ माजवला आहे, कधी कोणाचे दुकानाचे शटर फोडायचे कधी कुलूप तोडून, तर कधी टपरी चे पत्रे वाकून त्यातील सामान चोरून न्यायच्या जो सामान कामाचा नसेल त्याला अस्ताव्यस्तपणे बाहेर फेकून द्यायच्या अशा आशयाच्या प्रकारामुळे टपरी धारक व्यापारी पुरते धास्तावले आहेत टपरीधारक हे रोजंदारीने आपला व्यवसाय करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहेत त्यात अशा पद्धतीने दर एक दोन दिवसा आड होणाऱ्या चोऱ्या या मुळे टपरीधारक चिंतित झाले आहे पहाटे तीन ते चारच्या दरम्यान रितेश चायनीज व नाश्ता सेंटर ज्या स्टॉलचे कुलूप तोडताना चोरटे सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये केद झाले आहेत.